Women Officer Murder Case esakal
देश

बंगळूर हादरलं! घरात घुसून महिला खाण अधिकाऱ्यावर चाकूने सपासप वार; खुनामागं खाण माफियांचा हात?

खुनामागे खाण माफिया असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणाच्या तपासासाठी एसीपी पवन यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

बंगळूर : येथील सुब्रमण्यपूर पोलिस (Subramanyapur Police) ठाण्याच्या हद्दीत खाण आणि भूविज्ञान विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याची निर्घृणपणे भोसकून खून (Murder Case) केल्याची घटना घडली आहे. खाण आणि भूविज्ञान विभागाच्या उपसंचालक प्रतिमा (वय ३७) असे खून झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

त्यांच्या खुनामागे खाण माफिया असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कुवेंपू नगर, दोडकाकलासंद्र, सुब्रमण्यपूर येथील गोकुळ अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या घरात प्रतिमा राहत होत्या त्यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना एक मुलगा आहे. कौटुंबिक समस्यांमुळे पतीपासून दूर असलेल्या प्रतिमा या घरात एकट्याच राहत.

तिचे पती आणि मुलगा शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी येथे राहतात. खाण व भूगर्भशास्त्र विभागात उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या प्रतिमा या काल (ता. ४) नेहमीप्रमाणे कामावर गेल्या आणि रात्री आठच्या सुमारास शासकीय वाहनाने घरी आल्या. चालकाने त्यांना घराजवळ सोडले. त्यानंतर हल्लेखोरांनी घरात घुसून प्रतिमा यांच्यावर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केला आणि तेथून पळ काढला.

प्रतिमांचा मोठा भाऊ प्रतिश कंत्राटदार आहे. त्याने रात्री बहिणीच्या मोबाईलवर फोन केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही. दोन-तीन वेळा फोन करूनही उत्तर न आल्याने त्यांनी सकाळी जाऊन चौकशी करू, असा विचार केला व (ता. ५) सकाळी प्रतिमांच्या घरी आले असता, बहिणीचा खून झाल्याचे समजले. ही बाब तत्काळ पोलिस व नातेवाईकांना कळविण्यात आली.

सुब्रमण्यपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. बोटांचे ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी किम्स रुग्णालयात पाठवला. हल्लेखोरांनी कट रचून प्रतिमा कार्यालयातून घरी येण्याची वाट पाहत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे आढळून आले. माझ्या बहिणीची हत्या कोणी आणि का केली हे मला माहीत नाही. जो कोणी असेल त्याला पोलिस लवकरच अटक करतील, असा विश्वास भाऊ प्रतिश यांनी व्यक्त केला.

प्रतिमा यांच्या कामाबद्दल कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. त्यांनी कामासंदर्भात कोणावरही गंभीर आरोप केले नसल्याची माहिती आहे. त्या एक धाडसी महिला अधिकारी होत्या. खाण खात्यात दबावाखाली काम करावे लागते. बेकायदेशीर गोष्टी रोखणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही जबाबदारी आहे. प्रतिमा यांनी याबाबत निर्भयपणे काम केल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन पथकांची निर्मिती

याप्रकरणाच्या तपासासाठी एसीपी पवन यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रतिमा यांच्या घराच्या रस्त्यावर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या मारेकऱ्यांच्या चेहऱ्यांच्या आधारे पोलिसांनी अटकेसाठी सापळा रचला आहे. रामनगरात काम केल्यानंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रतिमा यांची बंगळूर येथे बदली झाली होती.

नुकतीच बेकायदेशीर खाणकामावर अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात त्या सहभागी झाल्या होत्या. अवैध उत्खनन बंद करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एका प्रकरणाचा तपास करून मला अहवाल दिला. प्रतिमा यांना काम करत असताना त्यांना कोणी त्रास किंवा धमक्या दिल्या का? याचा तपास करून दोषींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : पनवेलमध्ये पर्यावरणपूरक कागदापासून गणपतीच्या मूर्ती

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT