National Herald case Congress to hold nationwide press conference on Sunday
National Herald case Congress to hold nationwide press conference on Sunday National Herald case Congress to hold nationwide press conference on Sunday
देश

काँग्रेस रविवारी देशभर घेणार पत्रकार परिषद; ईडीच्या नोटिसांमुळे संताप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावली आहे. यामुळे काँग्रेस (Congress) रविवारी (ता. १२) देशभरात पत्रकार परिषद घेणार आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सोनिया यांना यापूर्वी ८ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, सोनिया यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीकडे नवीन तारीख मागितली होती. (National Herald case Congress to hold nationwide press conference on Sunday)

सोनिया गांधी यांना दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यासाठी २३ जूनची तारीख देण्यात आली आहे. जिथे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जबानी नोंदवली जाईल. याप्रकरणी राहुल गांधी यांचीही १३ जून रोजी चौकशी होण्याची शक्यता आहे. राहुल यांना यापूर्वी २ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते परदेश दौऱ्यावर असल्याने नवीन तारीख मागितली होती. ईडीने त्यांना १३ जून रोजी समन्स बजावले आहे.

केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने (Congress) निर्णय घेतला आहे की १३ जून रोजी राहुल गांधी ईडीसमोर हजर होतील तेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार ईडी कार्यालयाबाहेर आणि दिल्लीत सत्याग्रह करतील. मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे. पक्ष-समर्थीत यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीशी (National Herald case) संबंधित हे प्रकरण आहे.

यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध आयकर विभागाच्या तपासाची दखल येथील एका ट्रायल कोर्टाने घेतल्यानंतर एजन्सीने पीएमएलएच्या फौजदारी तरतुदींनुसार नवीन गुन्हा नोंदवला होता. भाजप (BJP) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि निधीच्या गैरव्यवहाराचा कट रचल्याचा आरोप केला होता. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेसचे एजेएलचे कर्ज असलेले ९०.२५ कोटी वसूल करण्याचा अधिकार मिळविण्यासाठी ५० लाख रुपये दिले, असा आरोप स्वामी यांनी केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT