Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu  esakal
देश

पंजाब काँग्रेसमध्ये फेरबदल, मात्र सिद्धूंमुळे पक्षासमोर अडचणीच

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने पक्षाची जबाबदारी अमरिंदरसिंग ब्रार यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना नवीन अध्यक्ष आवडला नसल्याचे दिसत आहे. पंजाब (Punjab) काँग्रेसची जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र आव्हाने जुनेच आहेत. अगोदर अमरिंदर यांच्या पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सिद्धू यांचे समर्थक काँग्रेस (Congress Party) नेत्यांनी अमरिंदर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दुसरीकडे सिद्धू यांनीही आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. नुकत्यात पार पडलेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित नव्हते. (Navjot Singh Sidhu Creating Problems Before New Punjab Congress Chief)

सिद्धू यांनी फोन न उचल्याचे अमरिंदर यांनी सांगितले. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाच्या पराभवानंतर हायकमांडच्या आदेशानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र नवीन अध्यक्ष निवडीनंतर ही ते शांत बसताना दिसेना. शुक्रवारी नवनियुक्त अध्यक्ष अमरिंदरसिंह ब्रार (Armindar Singh Brar) यांनी अमृतसरमध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला सिद्धू यांनी दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता ब्रार म्हणाले, की माजी प्रदेशाध्यक्ष समरालापासून दूर होते.

सिद्धू समर्थकांचा संताप

प्रदेश काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही. जेव्हा पक्षाच्या हायकमांडने अमरिंदर यांच्याकडे पक्षाचे सूत्रे सोपवली तेव्हा सिद्धूचे समर्थक भडकले. त्यांनी नाव घेत म्हटले की तिकिटांबदल्यात पैसे घेणारा नेता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT