New Army Chief Manoj Pandes special relationship with Nagpur New Army Chief Manoj Pandes special relationship with Nagpur
देश

नवे लष्करप्रमुख मनोज पांडे यांचे नागपूरशी विशेष नाते

मंगेश गोमासे

नागपूर : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी सध्याचे उपलष्करप्रमुख व मूळचे नागपूरकर असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे नवे लष्करप्रमुख (New Army Chief) होणार आहे. ३७ वर्षांपासून सैन्यात सेवारत लेफ्टनंट मूळचे नागपूर येथील लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची जानेवारी महिन्यात उपलष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. मनोज पांडे हे लष्करात सर्वांत वरिष्ठ आहेत. (New Army Chief Manoj Pandes special relationship with Nagpur)

मनोज पांडे यांनी लष्करात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख; ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे आणि नागपूर (Nagpur) आकाशवाणीच्या उद्‌घोषिका प्रेमा पांडे यांचे ते पुत्र आहे. पांडे यांचे लहान बंधू संकेत पांडे लष्करात कर्नल होते. सर्वांत लहान बंधू डॉ. केतन पांडे हे ब्रुनोईच्या राजाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते.

लेफ्टनंट जनरल पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरस्थित वायुसेनानगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीत दाखल झाले. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली (ब्रिटन) स्टाफ कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी ‘हायर कमांड कोर्स' केला आहे.

अशा सांभाळल्या जबाबदाऱ्या

मनोज पांडे (Manoj Pande) यांनी लष्करात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. लष्कराचे दक्षिण मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांड सेंटरचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या सोबतच लष्कराच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: धारावी पुनर्विकासासाठी नगरसेवक रणांगणात; ‘प्रलंबित’ प्रकरणांचा होणार अखेर निर्णय, तिढा सुटणार!

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

अंगणात तुळशी वृंदावन अन् दारात झोपाळा, 'ठरलं तर मग'च्या प्रियाने 'इथे' बांधलंय स्वप्नातलं फार्म हाऊस, रायगडमधील...

Police Homes : पोलिसांच्या घराचे स्वप्न होणार साकार; राज्य बँकेकडून १७६८ कोटींचे अर्थसाहाय्य

NEET 2026 Exam Cancelled : 22 लाख विद्यार्थ्यांची स्वप्नं उद्ध्वस्त! 'आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं'; राहुल गांधींची आक्रमक पोस्ट; NEET परीक्षेवरुन ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT