Dawood Ibrahim
Dawood Ibrahim esakal
देश

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर 25 लाख, 'D' कंपनीच्या टोळीवर 20 लाखांचं बक्षीस जाहीर : NIA

सकाळ डिजिटल टीम

भारतात पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्यानं दहशतवादी हल्ल्याचा कट करण्यात आलाय.

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या 'डी' कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) रोख बक्षीस जाहीर केलंय. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NIA नं 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय.

दाऊद इब्राहिमनं शस्त्रास्त्रं, स्फोटकं, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणारी टोळी भारतात पाठवलीय. भारतात पाकिस्तानी (Pakistan) एजन्सी आणि दहशतवादी संघटनांच्या (Terrorist Organization) सहकार्यानं दहशतवादी हल्ले घडवण्याची योजनाही त्यानं आखल्याची माहिती NIA नं दिलीय.

एजन्सीनं दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ ​​हाजी अनीस, जवळचा सहकारी जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना, शकील शेख उर्फ ​​छोटा शकील, इब्राहिम मुश्ताक, अब्दुल रज्जाक आणि मेमन उर्फ ​​टायगर मेमन यांच्याविरुध्दही बक्षीस जाहीर केलंय. दाऊद इब्राहिमसाठी 25 लाख रुपये बक्षिसाची रक्कम आहे, तर एजन्सीनं छोटा शकीलसाठी 20 लाख रुपये आणि अनीस, चिकना आणि मेमनसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये जाहीर केले आहेत, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. दाऊद पाकिस्तानातील कराचीमध्ये असल्याचा दावाही एजन्सीनं केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT