night curfew  
देश

महाराष्ट्रासह अनेक राज्यात नाइट कर्फ्यू; वाचा कुठे काय निर्बंध

सकाळ डिजिटल टीम

भारतात ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

भारतात ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टी यामुळे होणारी संभाव्य गर्दी आणि ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, तामिळनाडुसह १२ राज्यात नाइट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

दिल्ली - राज्य सरकारने ख्रिसमस आणि नव वर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात लोकांना मोठ्या संख्यनं एकत्र येण्यास बंदी घातली आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय़ोजन करता येणार नाही. तसंच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.

उत्तर प्रदेश - २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या आदेशानुसार निर्बंध कायम राहतील. तसंच लग्नात पाहुण्यांची संख्याही २०० पर्यंत मर्यादीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. याशिव्या इतर कार्यक्रमांमध्ये सॅनिटायजर, मास्क बंधनकारक आहे.

हरयाणा आणि गुजरातमध्येही नाइट कर्फ्यू लागू केला आहे. शनिवारपासून लागू करण्यात आलेला हा नाइट कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये २०० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे.

काश्मीरमध्येही वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात येणाऱ्या सर्वांना रॅपिड अँटिजेन टेस्ट बंधनकारक केलं आहे. पंजाबमधून जम्मू काश्मीरला येणाऱ्यांची टेस्ट लखनपूरमध्ये केली जात आहे. तर ३३ टक्के लोकांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल.

मध्य प्रदेशात ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकारने ओमिक्रॉनचा धोका पाहता रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. अद्याप राज्यात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही.

महाराष्ट्र - ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहेत. यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. राज्यातील चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर इनडोअर वेडिंगमध्ये १०० तर आउटडोअर वेडिंगमध्ये २५० लोक किंवा एकूण क्षमतेच्या २५ टक्के लोकांना उपस्थित राहण्यास परवागनी असेल. महाराष्ट्रातील नवे नियम सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

कर्नाटकात सार्वजनिकरित्या न्यू इयर पार्टी करण्यावर बंदी घातली आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू असतील. बेंगळुरुत मॉल, पब, बार, क्लबमध्ये गर्दी करण्यास मनाई असेल. तसंच ५० टक्के क्षमतेनं रेस्टॉरंट, पब सुरु राहतील. ख्रिसमसला चर्चमध्ये ५० टक्के क्षमतेनं लोकांना उपस्थित राहता येईल. शिवाय कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन कऱणं बंधनकारक असेल.

तामिळनाडुतही ओमिक्रॉनच्या संकटामुळे ख्रिसमस आणि न्यू ईयर पार्टी करताना काही नियम लागू केले आहेत. समुद्र किनारी गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध लादले आहेत. तसंच कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

राजस्थानमध्ये दुसरी लाट आल्यानंतर लागू असलेला नाइट कर्फ्यू अद्याप मागे घेतलेला नाही. सध्या तरी आणखी काही निर्बंध लागू केले नसले तरी प्रशासन अलर्ट झाले आहे. ओडिशात न्यू इयर पार्टीच्या सेलिब्रेशनवर निर्बंध घातले आहेत. तेलंगनात एका दिवसात १० ओमिक्रॉन रुग्ण आढळल्यानं गाव लॉकडाऊन केलं आहे. तर चंदिगढमध्येही नाइट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

Nagpur Farmers Protest: ''कर्जमाफीचं काय ते बोला'' शिष्टमंडळाची बोलती बंद, मुख्यमंत्र्यांसोबत होणार चर्चा

SCROLL FOR NEXT