Nirbhaya-Convicts 
देश

Nirbhaya Case : अखेर निर्भयाचे दोषी फासावर लटकणार, आता 'ही' तारीख!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून फक्त 'तारीख पे तारीख' दिली जात असलेल्या निर्भया बलात्कार केस प्रकरणी आज (ता.५) दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. नवीन डेथ वॉरंट दाखल करण्यात आले असून या सर्व चारही दोषींना २० मार्चला सकाळी ५:३० वाजता फाशी दिली जाणार आहे, यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

कायद्यातील पळवाटांमुळे या केसचा निकाल वारंवार पुढे ढकलण्यात येत होता. मात्र, आता यावर अंतिम निर्णय झाला असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट होते. या प्रकरणातील दोषी अक्षय ठाकूर, पवनकुमार गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांना फाशी दिली जाणार आहे.

दरम्यान, निर्भया प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार होती. मात्र, दोषी पवनकुमारने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली. ती राष्ट्रपतींनी फेटाळून लावली होती. क्युरेटिव्ह याचिकेवरील निर्णय न झाल्याने पटियाला हाऊसने २ मार्चला फाशीची शिक्षा काही काळासाठी पुढे ढकलली होती. 

कोर्टाच्या या निर्णयाचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अखेर सर्व कायदेशीर पर्याय संपल्यानंतर नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आले. यानुसार, येत्या २० मार्चला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकविण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यात कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्याचं घर सील करताच बच्चू कडू संतापले! थेट हातोडा घेतला अन्...

Gold Silver Price: धनत्रयोदशीआधी सोन्याच्या भावात मोठी घसरण! चांदीही 1,86,273 रुपयांवर; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील ताजे दर किती?

Mumbai Rain: मुंबईत पावसाची रिपरिप, उकाड्यापासून दिलासा! पुढील काही तासांत मेघगर्जनेची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Marathi News Live Updates : वांद्रेतील 'व्हीएन स्फेअर मॉल'मधील रेस्टॉरंटमध्ये आग

Pune News: एकाच दिवशी दोन परीक्षा, विद्यार्थ्यांसमोर पेच; अभियांत्रिकीच्या नियमित, बॅकलॉग परीक्षा एकाच दिवशी

SCROLL FOR NEXT