No-Confidence Motion Updates Rahul Gandhi speaks on no-trust debate in Parliament on gautam adani  Sakal
देश

Rahul Gandhi: घाबरू नका, मी आज अदानीवर बोलणार नाही....पहिल्याच चेंडूवर राहुल गांधींचा सिक्सर

Rahul Gandhi: लोकसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा होत आहे.

राहुल शेळके

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलायला सुरुवात केली आहे. ते म्हणाले, गेल्या वेळी जेव्हा मी अदानीजींवर बोललो तेव्हा लोकांना त्रास सहन करावा लागला होता. राहुल गांधी टोमणे मारत म्हणाले, 'मी आज अदानींवर बोलणार नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी घाबरण्याची गरज नाही. आज मी मनापासून बोलणार आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यत गेलो. मी मोठी यात्रा केली. मला भारताला पाहायचे होते. लोकांमध्ये मला जायचे होते. त्यांना समजून घ्यायचे होते.

काही गोष्टी मला समजल्या. ज्या गोष्टीचं मला प्रेम होतं ज्या गोष्टीसाठी मी मरायलाही तयार होतो, ज्या गोष्टींसाठी दहा वर्षे शिव्याही खाल्ल्या ती गोष्ट मला समजून घ्यायची होती.

मी गेल्या काही वर्षांपासून दहा ते बारा किलोमीटर चालतो आहे. मी हे सगळं का केलं याचा विचार करतो आहे. माझ्या मनात अहंकार होता. मात्र भारत अहंकाराला संपवण्याचे काम करतो. दोन ते तीन दिवसांनी माझ्या गुडघ्यांमध्ये त्रास होण्यास सुरुवात झाली. माझे जुने दुखणे पुन्हा वाढले.

लोकसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज सभागृहात याबाबत बोलत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी 4 वाजता सभागृहात काँग्रेसला उत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT