WhatsApp
WhatsApp Twitter
देश

अटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट

नामदेव कुंभार

WhatsApp to Delhi high court : मागील काही दिवसांपासून whatsapp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात चर्चा सुरु आहे. whatsapp प्रायव्हसीची पॉलिसी मान्य न केल्यास तुमचं खातं डिलीट होऊ शकतं. whatsappने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली आहे. कोर्टात whatsapp नं आपले वकील कपिल सिब्बल यांच्यामार्फत कोर्टता बाजू मांडताना म्हटलं की, 'युजर्सला नवीन प्रायव्हेसी अटी स्वीकारण्याबाबत विचारलं जात आहे. युजर्सनं या अटी मान्य केल्या नाहीत. तर हळूहळू खाती डिलीट करण्यात येतील. '

whatsapp ची बाजू कोर्टात मांडताना कपिल सिब्बल म्हणाले की, ' युजर्सला नवीन अटी स्वीकारण्याचा आम्ही आग्रह करत आहे. जर युजर्सने सहमती न दर्शवल्यास हळूहळू whatsapp खाती डिलीट करण्यात येतील. या अटी स्थगित करण्याचा whatsapp चा कोणताही विचार नाही.' (no deferment of may 15 privacy policy deadline whatsapp to delhi hc)

whatsapp कंपनीनं नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. ही पॉलिसी नाकारण्याचा कोणताही मार्ग युझरकडे नाहीये. यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. जानेवारीमध्ये whatsapp कंपनीनं या नवीन अटींची घोषणा केली होती. त्यानंतर मे महिन्यापर्यंत याला कंपनीकडून स्थगिती देण्यात आली होती. एकतर ही पॉलिसी स्विकारा अन्यथा व्हॉट्सपवरुन चालते व्हा, असा एकप्रकारे सज्जड दम असलेली नोटीफिकेशन आहे. नवीन अटींनुसार, व्हॅट्सअॅप युजर्सचा डेटा फेसबूकसोबत शेअर करु शकतो. तुर्तास दिल्ली उच्च न्यायालयानं तीन जूनपर्यंत या सुनावनीला स्थगिती दिली आहे. अडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा आणि याचिकाकर्ताकडून या नवीन पॉलिसीला स्थिगिती देण्याची मागणी केली होती.

जानेवारी 2021 पासून व्हॉट्सअप नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनेकांनी व्हॉट्सअप सोडून सिग्नलसारखे अॅप वापरण्याचा निर्णय घेतला. याचा व्हॉट्सअपला फटका आणि इतर मेसेजिंग ऍपला फायदा झाला होता. अनेक युझर्सनी व्हॉट्सअपबाबत नाराजी व्यक्त करत सोडण्यास सुरवात केली होती. गेल्यावेळेला व्हॉट्सएपने युझर्सला नवी पॉलिसी स्विकारण्यासंदर्भात दोनच पर्याय सोडले होते. एकतर युझरने पॉलिसीला स्विकारावं अन्यथा हा प्लॅटफॉर्म सोडून द्यावा. आताही तसंच आहे मात्र, यावेळच्या अपडेटनुसार व्हॉट्सअर युझरला पुरेसा वेळ देत आहे. जेणेकरुन युझरने नव्या पॉलिसीला योग्यरितीने वाचावं आणि समजून घेऊनच स्विकारावं.

व्हॉट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन झालेल्या वादानंतर चार स्टेट्स ठेवून आपलं स्पष्टीकरण युझरपर्यंत पोहोचवलं होतं. मात्र, आताच्या नव्या मोहीमेमध्ये अगदी चॅटच्यावर आपल्याला एक डॉक्यूमेंटसारखे चॅट दिसेल. ते उघडल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपच्या पॉलिसीबाबत माहिती मिळेल. या पॉलिसीमध्ये स्पष्टरित्या लिहण्यात आलं आहे की, व्हॉट्सअप आपली खाजगी माहिती वाचत नाही तसेच ती बघतही नाही. आमची सिस्टीम एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे आणि व्हॉट्सअप कंपनी आपल्या या प्रायव्हसीबाबत प्रतिबद्ध आहे. त्यात तडजोड होणार नसल्याचं व्हॉट्सअपने स्पष्ट केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT