Petrol Pump Sakal
देश

देशातील पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याबाबत केंद्राचे स्पष्टीकरण

पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा असल्याच्या बातम्या मोठ्या व्हायरल झाल्यानंतर केंद्राकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नसल्याचे सरकारने म्हटले आहे. देशातील उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर केंद्राकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Petrol Diesel Shortage News )

गेल्या काही दिवसांपासून काही भागात PSU रिटेल आउटलेटवर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत होती. यामुळे अनेकांना गर्दी आणि पेट्रोल भरण्यास विलंब अशा अडचणींना सामोरे जावे लागले होते. या गर्दी आणि विलंबानंतर नागरिकांमध्ये देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले. परंतु, देशातील काही विशिष्ट भागात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ पाहण्यास मिळाल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत जून 2022 च्या पहिल्या सहामाहीत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) मागणीत 50 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अधिक मागणी दिसून आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान ही वाढ कृषी कामांमुळे झाल्याचे मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे घाऊक पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करणारे आता किरकोळ पेट्रोल पंपांवरून खरेदी करत असल्याने अडचणीही वाढल्या आहेत. खासगी मार्केटिंग कंपन्यांनी विक्री कमी केल्याने त्याचा बोजा सरकारी कंपन्यांवर पडल्याचेही पेट्रोलियम मंत्रालयाने (Petrolatum Ministry ) म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

इलॉन मस्कने पुन्हा एकदा जगाला केलं शॉक! Wikipedia ला टक्कर देणार Grokipedia, कोणतं आहे बेस्ट? पाहा एका क्लिकवर

"तर आमची मैत्री तुटेल..." राज ठाकरेंसोबत सिनेमा बनवण्यावर महेश मांजरेकरांनी मांडलं मत; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

SCROLL FOR NEXT