Weather Update
Weather Update esakal
देश

Weather Update : पुढील तीन दिवसांत 'या' राज्यांत मुसळधार पाऊस

सकाळ डिजिटल टीम

मान्सून आज दाखल होणार की उद्या.. याची उत्सुकता राज्यातील प्रत्येक नागरिकाला लागलीय.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) लोक कडाक्याच्या उन्हानं हैराण झाले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेच्या लाटेमुळं दिवसाचं तापमान वाढलंय. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department, IMD) देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं सांगितलंय की, पुढील तीन दिवसांत ईशान्य भारत, पश्चिम बंगाल (West Bengal) आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवलीय. यासोबतच येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि लगतच्या पूर्व भारताच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलंय.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. 10 आणि 11 जून रोजी अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.

शिवाय, पुढील 5 दिवसांत बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तर, येत्या काही दिवसांत कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल. यासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पाॅंडेचेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये पुढील 5 दिवसांत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तसेच तामिळनाडू आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 12 तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार

मान्सून आज दाखल होणार की उद्या.. याची उत्सुकता राज्यातील प्रत्येक नागरिकाला लागली आहे. असं असतानाच (IMD) हवामान विभागानं मान्सूनच्या आगमनाबद्दल शुभ संकेत दिले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून (Maharashtra) राज्यामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आगामी काही काळात मान्सून हा मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात व्यापला जाणार आहे. तर गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात मान्सूनचे आगमन होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती, तो अखेर दोन दिवसांमध्ये दाखल होऊन खरिपाच्या पेरण्या वेळेत होतील, असा आशावाद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT