Corona
Corona Sakal
देश

रुग्णांना आवश्यक नसताना रुग्णालयात भरती केलं जातंय; 35 डॉक्टरांचे केंद्राला पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून पूर्वीच्या दोन लाटेंप्रमाणे तिसऱ्या लाटेतही अनावश्यक चाचणीवर भर दिला जातोय, असा दावा देशातील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांनी केलाय. केंद्र आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांनी या अनावश्यक उपचारपद्धती आणि चाचणीचा वापर थांबवला पाहिजे, अशी विनंती या डॉक्टरांनी केली आहे. (Doctors Letter to central and state government)

विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ३५ डॉक्टरांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे. याच ३५ डॉक्टरांपैकी एक, जसलोक हॉस्पिटलमधील डॉ संजय नागराल यांनी सांगितले की, "कोवि़ड उपचार, चाचणी आणि रुग्णालयात भरती करणे यावर देशात अनावश्यक भर दिला जातोय. आमच्यामते हे जास्त होतंय. सद्यस्थितीबाबत आमची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यापत्राद्वारे करण्यात आला आहे."

अमेरिकेतील हार्वर्ड आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील भारतीय वंशाच्या काही डॉक्टरांनी या पत्रावर स्वाक्षरी केलीये. या पत्रात म्हटलंय, "2021 च्या कोरोना लाटेतील काही चुकांची पुनरावृत्ती 2022 मध्ये होतेय. डॉक्टरांच्या या टीमने तीन प्रमुख समस्या मांडल्या आहेत. अवास्तव औषधोपचार, अवाजवी चाचण्या आणि आवश्यकता नसतानाही रुग्णालयात भरती करणे. ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य आहेत. काही रुग्णांना तर औषधांचीही आवश्यकता नाही किंवा त्यांना किरकोळ औषधोपचारानंतर रुग्ण बरे होत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. मधुकर पै यांनी पत्रात म्हटलंय की, व्हिटामिन्स आणि azithromycin, doxycycline, hydroxychloroquine, favipiravir आणि ivermectin यांसारखी औषधं देणं चुकीचे आहे. अशा औषधांच्या अवैध वापरामुळे दुस-या डेल्टा लहरीदरम्यान mucormycosis चा उद्रेक झाला.बहुसंख्य रुग्णांची आधी रॅपिड अँटिजन टेस्ट, आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचं आहे.

यानंतर संबंधित रुग्णांना फक्त होम आयसोलेशनमध्ये ठेवले तरी पुरेसं आहे. मात्र, अशा रुग्णांनाही सीटी स्कॅन तसेच महागड्या रक्तचाचण्या करण्याचा सल्ला दिला जातोय. या महागड्या चाचण्या आणि गरज नसतानाही रुग्णालयात भरती केल्याने कुटुंबांवरील आर्थिक बोजा वाढत असल्याची खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

डॉ. सत्चित बलसारी यांनी पत्रात म्हटलंय की, जगभरातील रुग्णांपर्यंत कोरोनाबाबत चुकीची किंवा अर्धवट माहिती पोहोचतेय. अमेरिकेत लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळत नाही हे त्याचेच उदाहरण आहे. भारतात कोरोनाग्रस्तांवरील उपचार यात आरोग्य विभाग आणि वैद्यकीय क्षेत्राने केलेले काम निराशाजनक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT