Corona 
देश

'या' राज्यात दोन दिवसांतील चाचण्यात आढळले तब्बल 84 टक्के ओमिक्रॉनबाधित

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या संकटांनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकीकडे अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन (Omicron variant) या व्हेरियंटचा धुमाकूळ सुरु झाला असून भारतात देखील कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता एक अशी माहिती समोर येत आहे, जी थोडीशी भीतीदायक आहे. दिल्लीच्या (New Delhi) आरोग्य मंत्र्यांनी (Health Minister) राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीनंतर काळजी थोडी वाढली आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाच्या सापडलेल्या रुग्णांपैकी 84 टक्के नवे रुग्ण हे अत्यंत संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने बाधित असल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. 30 आणि 31 डिसेंबर या दोन दिवसांतील चाचण्यांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट्समधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या दोन दिवसांतील नमुन्यांपैकी 84 टक्के रिपोर्ट्स हे ओमिक्रॉन बाधित असल्याचं आढळून आलंय. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendar Jain) यांनी ही माहिती दिली आहे. सध्या देशातील जवळपास 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉन विषाणू पसरला आहे. या 23 राज्यांपैकी महाराष्ट्र हेच राज्य सर्वांत अधिक संक्रमित राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात सध्या 510 ओमिक्रॉनबाधित रुग्ण असून त्याखालोखाल 351 रुग्ण हे दिल्लीमध्ये सापडले आहेत.

पुढे जैन यांनी माहिती देताना हेही स्पष्ट केलंय की, राज्यातील दवाखाने आणि क्लिनीक्स चालवण्यामध्ये कसल्याही प्रकारचा तुटवडा नाहीये. शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. डिसेंबर ३०-३१ च्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालानुसार तीन प्रयोगशाळेतील 84 टक्के नमुन्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. बहुतेक प्रकरणे ओमिक्रॉनची आहेत, असं जैन दिल्ली विधानसभेत म्हणाले. शहरात रविवारी 3,194 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शनिवारच्या तुलनेत 15 टक्क्यांनी जास्त रुग्ण सापडले आहेत. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून रविवारी संध्याकाळपर्यंत एकूण मृतांची संख्या 25,109 झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hajare Karandak : मुंबई संघाचा विजयी चौकार; ४४४ धावांचा डोंगर, सर्फराझचे झंझावाती दीडशतक

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये 'महायुती'चा गोंधळ! राष्ट्रवादीने २१ की ४१ जागा लढवायच्या? नेत्यांकडेच उत्तर मिळेना

Viral Video: रिलसाठी जीवाशी खेळ नडला ! शरीराला आग लावून धावत्या बाईकवर स्टंट अन् पुढच्या क्षणात नको तेच घडलं; धडकी भरवणारा व्हिडिओ

Udayanraje Bhosale: मित्र नगराध्यक्ष होताच उदयनराजेंच्या डोळ्यात आनंदाश्रू; मध्यरात्रीच गाठलं कराड, शिवसेना नेत्याच्या गळाभेटीने चर्चांना उधाण!

आधी वेळ बदलली, आता मालिकाच बंद होणार; फक्त ८ महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT