Mamata Banerjee Arvind Kejriwal K Chandrashekhar Rao Sakal
देश

भाजपाशी लढण्याविषयी विरोधकांमध्येच फूट? अनेकांची बैठकीकडे पाठ

या बैठकीच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट झाली.

वैष्णवी कारंजकर

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या काही नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी राष्ट्रपती निवडणुकीबद्दल चर्चा होणार आहे आणि विरोधकांचा राष्ट्रपती पदाचा चेहरा कोण असेल यावर चर्चा होणार आहे. तसंच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढण्याची रणनीतीही ठरवणार आहे. (Meeting of Opposition leaders for Presidential Elections)

मात्र या बैठकीला काही पक्षातल्या नेत्यांनीच पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. या बैठकीसाठी तेलंगण राष्ट्र समिती आपला प्रतिनिधी पाठवणार नाही. तर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हेही या बैठकीत सहभागी होणार नाहीत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) या विषयात लक्ष घालणार आहे.

या बैठकीच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) या दोघांची भेट झाली. राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुका १८ जुलै रोजी होणार आहेत. तर त्यांचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे. माजी मंत्री एचडी देवेगौडा, जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती हे या बैठकीमध्ये सहभागी होतील, अशी माहिती मिळत आहे.

तर एम के स्टॅलिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कझगम (द्रमुक) पक्षाच्या वतीने टीआर बालू हे सहभागी होतील, तर शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, रणदीप सिंग सुरजेवाला हे देखील काँग्रेसच्या वतीने बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT