देश

Pankaja Munde : "मला वाटतं प्रेम म्हणजे प्रेम असतं..." ; लव्ह जिहादवर पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या

Sandip Kapde

Pankaja Munde : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी 'लव्ह जिहाद'वर भाष्य केले आहे. धर्मांतराच्या कथित कटाच्या नावाखाली आंतरधर्मीय विवाहाला काही घटकांकडून होत असलेल्या विरोधावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "...मला वाटतं प्रेम म्हणजे प्रेम आहे. प्रेमाला भिंती दिसत नाहीत. जर दोन माणसं निव्वळ प्रेमातून एकत्र आली असतील तर त्याचा आदर केला पाहिजे. पण त्यामागे काही कटुता आणि कारस्थान असेल तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे."

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत जबलपूरमध्ये मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतील कामगिरीची नोंद केली. पंकजा मुंडे यांना वाढत्या लव्ह जिहादबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, गरीब कल्याण आणि विकास हा नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर राहिला आहे. जर कोणावर प्रेम असेल तर त्याला प्रेम करू दिले पाहिजे, प्रेमात कोणतीही भिंत नसावी पण त्यात काही कट कारस्थान असेल तर ते वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना कधी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हटले, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज त्या मंत्रीही नाहीत, त्या फक्त भाजपच्या सचिव आहेत. वडिलांप्रमाणे पक्षाची सेवा करत असल्याचे त्या म्हणाल्या.

महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजने’चेही मुंडे यांनी कौतुक केले. भाजपच्या या योजनेला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आणलेल्या 1500 रुपयांच्या नारी सन्मान योजनेचा प्रभावही त्यांनी नाकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT