देश

Parliament Uniform: शर्टवर 'कमळा'ची फुलं, मार्शल्सच्या डोक्यावर 'मणिपुरी' फेटा! संसदेच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलला

भाजप यातही राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार विरोधकांकडून वारंवार टार्गेट होत आहे. कारण सरकार कुठल्याही गोष्टीत राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे, त्यावरुन विरोधकांनी भाजपला धारेवर धरलं आहे.

संसदेतील कर्मचाऱ्यांचा नवा युनिफॉर्म समोर आला असून कमळाची फुलं अशी प्रिंट असलेल्या कपड्यापासून हा युनिफॉर्म तयार करण्यात आला आहे. (Parliament staff uniform Lotus flowers on shirt and Manipuri turban on head of marshals)

नेमका प्रकार काय?

काँग्रेसचे खासदार मनिकम टागोर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. यात ते म्हणतात, सरकारनं संसदेच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्मवर कमळाचं फुल असलेला गणवेश का निवडला आहे? जे भाजपच निवडणूक चिन्ह आहे. त्याऐवजी देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ किंवा राष्ट्रीय पक्षी मोर यांची चित्र का नाहीत? (Latest Marathi News)

काँग्रेस म्हणतं क्षुद्र मानसिकता

टागोर पुढे म्हणतात की, भाजपची ही किती क्षुद्र मानसिकता आहे. त्यांनी कमळाचं फुलाचं राजकारण G20च्या लोगोमध्ये देखील केलं. आता पुन्हा संसदेतील कर्मचाऱ्यांच्या ड्रेसवरुन राजकारण सुरु केलंय. काय तर म्हणे कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. हा असला प्रकार योग्य नाही. भाजपनं आता जरा मोठं व्हाव, संसदेला एकतर्फी बनवू नये. (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादीची सडकून टीका

तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसनंही यावरुन भाजपला सुनावलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लायडो क्रॅस्टो यांनी म्हटलं की, संसदेच्या कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्मवर कमळ लोगो छापून भाजपनं आपल्या लोकशाहीला टेम्पल डेमोक्रसी बनवू पाहात आहे.

आपल्या स्वतःच्या प्रोपोगंडासाठी भाजप संसदेचा गैरवापर करत आहे. ऑगस्ट हाऊस हे भारताच्या लोकांचं आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचं नव्हे, असंही त्यांनी पुढे म्हटलं.

विशेष अधिवेशनासाठी युनिफॉर्म

आगामी पाच दिवशीय विशेष अधिवेशनासाठी मोदी सरकारनं संसदेच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा गणवेश तयार केला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांसाठी गडद गुलाबी रंगाचं नेहरु जॅकेट आहे. यापूर्वी बंदगळा सूट या कर्मचाऱ्यांकडून वापरला जात होता. त्याचबरोबर या गणवेशातील शर्टही बदलण्यात आलं असून यामध्ये गडद गुलाबी रंगाचं शर्ट आणण्यात आलं असून त्यावर बारीक कमळाच्या फुलाचं डिझाईन आहे. यावर खाकी रंगाची पॅन्ट कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे.

मार्शल्स, सुरक्षा रक्षकांचे कपडे बदलणार

त्याचबरोबर दोन्ही सभागृहातील मार्शल्सचे कपडे देखील बदलण्यात आले आहेत. त्यांनी आता मणिपुरी पगड्या परिधान कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर संसद भवनातील जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा गणवेशही बदलण्यात आला असून आत्तापर्यंत ते सफारी सूट घालायचे आता त्यांच्यासाठी मिलिटरी सारखे कपडे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT