Cut Practice_doctor_Farma Company
Cut Practice_doctor_Farma Company 
देश

डॉक्टरांच्या भेटवस्तूंसाठी फार्मा कंपन्यांना आयकर सवलत नाही - सुप्रीम कोर्ट

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : फार्मा कंपन्यांनी डॉक्टरांना भेटवस्तू देणं बेकायदा आहे. त्यामुळं अशा भेटवस्तूंसाठी फार्मा कंपन्यांना इन्कम टॅक्स सूटसाठी दावा करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. न्या. उदय उमेश ललित न्या. एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली आहे. (Pharma companies not eligible for income tax exemption for gifts given to doctors SC)

खंडपीठानं म्हटलं की, फार्मा कंपन्यांनी डॉक्टरांना दिलेल्या मोफत भेटवस्तू या तांत्रिकदृष्ट्या मोफत म्हणता येणार नाहीत. कारण अशा प्रकारच्या मोफत म्हटल्या जाणाऱ्या भेटवस्तूंचा खर्च हा औषधांच्या किंमतीतून वसूल केला जातो. यामुळं औषधांच्या किंमती वाढतात आणि समाजिकदृष्ट्या हे चुकीचं आहे.

भारतीय उपचार परिषद (व्यावसायिक आचरण, शिष्टाचार आणि नैतिकता) नियमावली २०२२ च्या ६.८ अनुसार, औषध कंपन्यांकडून डॉक्टरांकडून मोफत भेटवस्तू स्विकारणे दंडनीय गुन्हा आहे. या अनुषंगानं केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (CBDT) एक पत्रक जाहीर केलं असून यामध्ये स्पष्ट केलंय की, डॉक्टरांना औषध कंपन्यांनी केलेला खर्च कलम ३७ (१) संदर्भ १ लाभासाठी अपात्र आहे.

अॅपेक्स लॅबोरेटरीज प्रा. लि. विरुद्ध आयकर उपायुक्त यांच्या खटल्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं ही टिप्पणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT