PM Awas Yojana
PM Awas Yojana sakal
देश

PM Awas Yojana: PMAY नवी यादी जाहीर, असे तपासा तुमचे नाव!

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकारने 1 एप्रिल 2016 पासून ग्रामीण गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) सर्व गरीब कुटुंबांना मोफत घरे दिली जातात, त्यासाठी हप्त्याने रक्कम दिली जाते. या अंतर्गत 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भारत सरकारने प्रधान मंत्री आवास योजना यादी अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. PMAY यादी घर मंजूर, घर पूर्ण, निधी हस्तांतरित आणि इतर माहितीसह प्रकाशित करण्यात आली आहे. माहितीनुसार, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी घरे पूर्ण केली जाणार आहेत. 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 1.73 कोटी घरे पूर्ण झाली आहेत.

पूर्वी प्रधानमंत्री इंदिरा आवास योजना असे याचे नाव होते. ते बदलून प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) असे करण्यात आले. पक्के घर नसलेल्या आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (Pmay) सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (PMAYG) अंतर्गत, सरकार SC/ST/अल्पसंख्याक आणि गैर-SC-ST ग्रामीण कुटुंबांना मदत पुरवते. अशा लोकांना घरे बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते, त्यासाठी या लोकांकडून वेळोवेळी ऑनलाइन आणि ऑफलाइनद्वारे अर्ज घेतले जातात.

शहरी यादी 2022-23 कशी तपासायची?

  • सर्वप्रथम, इंदिरा गांधी आवास योजनेची यादी पाहण्यासाठी, त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://PMAYG.Nic.In/Netiay/Home.Aspx वर जावे लागेल.

  • https://PMAYG.Nic.In/Netiay/Home.Aspx वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

  • https://PMAYG.Nic.In/Netiay/Home.Aspx वेबसाइटवर दाखवलेल्या मेनूबारमधील Awaassoft च्या पर्यायावर क्लिक करा. आणि Report निवडा.

  • रिपोर्टवर क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्याच्या खाली तुम्हाला अनेक पर्याय पाहायला मिळतील.

  • A A. Physical Progress Report या ऑप्शनमधील Year Wise House Completed Reports हा पर्याय निवडावा लागेल.

  • तुम्ही Year Wise House Completed Report पर्याय निवडताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला फिल्टरनुसार हवी असलेली माहिती मिळू शकेल.

  • त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षासाठी पंतप्रधान आवास योजनेचा अहवाल पाहायचा आहे ते निवडावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT