PM Kisan Yojana esakal
देश

PM kisan योजनेच्या लाभार्थ्यांनी त्वरीत करा केवायसी, न केल्यास....

जे लाभार्थी ३१ जुलैपर्यंत केवायसी करणार नाहीत त्यांचे शेवटचे हप्ते अटकण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी पुढे येतेय.पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या टप्प्यांत मिळणाऱ्या हप्त्यांसाठी शासनाने केवायसी व्हेरीफिकेशम बंधनकारक केलेय.३१ जुलैपर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करण्याबाबतची नोटीस शासनाने जारी केली आहे.जे लाभार्थी ३१ जुलैपर्यंत केवायसी करणार नाहीत त्यांचे शेवटचे हप्ते अटकण्याची शक्यता आहे.

३१ जुलैपर्यंत करावे केवायसी

आतापर्यंत पीएम योजनेच्या ११ हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहे.या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते.ही धनराशी दोन हजार रूपयांच्या तीन टप्प्यांमध्ये दिली जाते.मात्र या योजनेत अनेक असे लोक आहेत जे शेतकरी नसूनही या योजनेचा लाभ घेत आहेत.अशा फसवणूकदारांना आळा घालण्यासाठी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने केवायसी बंधनकारक केलंय.केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ दिली गेली आहे.

तुमच्या मोबाईलवरून करू शकता केवायसी,जाणून घ्या

सगळ्यात आधी पीएम किसाच्या pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जा.

यानंतर होमपेजवर फॉर्मर्स कॉर्नरच्या e-KYC टॅबवर क्लिक करा.

यावर क्लिक करताच तुम्हाला नवीन टॅबवर आधार नंबरची माहिती विचारली जाईल.

आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर वन टाईम ओटीपी येईल.

हा ओटीपी सबमिट करताच तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

मोबाईलवर शक्य नसल्यास तुम्ही जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊनही केवायसी करू शकता.त्यासाठी तुम्हाला १७ रूपये ई-केवायसी फिस द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT