PM Narendra Modi criticized Congress sakal
देश

देशात काँग्रेस पक्ष नसता तर..., पाहा मोदी काय म्हणाले?

PM Narendra Modi criticized Congress: पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल केला.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज पुन्हा काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला. काँग्रेस नसती तर देशात काय घडलं असतं? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. त्यावरून त्यांनी काँग्रेसच्या चुकांचा पाढा संसदेत वाचला. महात्मा गांधींना देखील माहिती होतं की काँग्रेस नसती तर काय झालं असतं? त्यांना देखील काँग्रेस नको होती, असं पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले. (PM Narendra Modi criticized Congress)

काँग्रेस नसती तर...

लोकशाही (Democracy) काही तुमची देण नाही. या घराणेशाहीपासून लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. भारत म्हणजे इंदिरा या विचारधारेचा हा परिणाम आहे. काँग्रेस नसेल तर काय होईल, हे सर्वांना माहिती होतं. हे महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) देखील माहिती होतं. त्यामुळे त्यांना काँग्रेस नको होती. महात्मा गांधींच्या इच्छेनुसार काँग्रेस नसती तर काय झाले असते? लोकशाही घराणेशाहीतून मुक्त झाली असती. भारत विदेशीऐवजी स्वदेशी संकल्पावर चालला असता. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसता तर जातीयवाद आणि भ्रष्टाचार नसता. काँग्रेस जर नसती शिखांचं नरसंहार झाला नसता. वर्षानुवर्ष पंजाब दहशवादामध्ये धगधगत नसता. काँग्रेस नसती तर सामान्य माणसांना रस्ता, विजेसाठी वाट पाहावी लागली नसती, असा जोरदार हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.

अमेरिका, ब्रिटेन कोरोनापासून त्रस्त आहे. १९ देशात जिथं युरो करन्सी आहे तिथे महागाई वाढलेली आहे. पण, आम्ही महामारीच्या काळात महागाई रोखण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. या महागाईची तुलना युपीए सरकारसोबत केली तर समजेल की महागाई काय असते? त्यावेळी दुहेरी आकड्यात महागाई होती. आता भारत एकमेव अशी अर्थव्यवस्था आहे जिथं महागाई कमी आहे. इतर देशात अर्थव्यवस्थेची वाढ कमी झाली आहे, महागाई वाढलेली आहे, असं म्हणत तत्कालीन काँग्रेस सरकारवर मोदींनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT