देश

‘सरदारधाम भवन’चे पंतप्रधानांकडून आज उद्‌घाटन

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातेतील अहमदाबाद शहरात उभारलेल्या सरदारधाम भवनचे शनिवारी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्‌घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे, ते ‘सरदारधाम भवन टप्पा २’ चे भूमिपूजनही करतील. या भवनाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी तसेच युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न आहेत. सरदारधाम भवनात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सरदारधाम भवनचे लोकार्पण व कन्या छत्रालयाच्या फेज II चे भूमीपूजन करतील. समाजात दुर्बल वर्गाच्या प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत सरदारधाम सातत्याने काम करत आले आहे.

अहमदाबाद येथील सरदारधाम भवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. कन्याछात्रालय मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देत आहे आहे. ही सुविधा कोणत्याही आर्थिक मापदंडाविना उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT