देश

PM मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर, अलीगढ विद्यापीठाची कोनशीला बसवणार

नामदेव कुंभार

PM Modi Aligarh Visit: पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाने तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची कोनशीला बसवणार आहेत. त्यानंतर मोदी उत्तर प्रदेशमधील जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान उत्तर प्रदेश औद्योगिक संरक्षण कॉरिडॉरच्या अलीगढ नोड येथील आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील. उत्तरप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित असतील.

राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाबद्दल

महान स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाज सुधारक, राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांच्या स्मृती आणि सन्मानार्थ राज्य सरकारतर्फे या विद्यापीठाची स्थापना केली जात आहे. अलिगढच्या कोल जिल्ह्यातील लोढा आणि मुसेपूर करीम जारौली या गावातील 92 एकर क्षेत्रावर हे विद्यापीठ स्थापन केले जात आहे. अलीगढ विभागातील 395 महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होतील.

उत्तरप्रदेशच्या संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरबद्दल

21 फेब्रुवारी 2018 रोजी लखनऊमध्ये उत्तरप्रदेशातील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेचे उदघाटन करताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या स्थापनेची घोषणा केली होती. अलिगढ, आग्रा, कानपूर, चित्रकूट, झाशी आणि लखनौ – याठिकाणी एकूण 6 नोड्स मधे संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे नियोजन केले होते. यापैकी अलीगढ नोडमधील जमीन वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून, या नोडमध्ये 1245 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 19 कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी आणि 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mundhwa land Case: मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक; अमेडिया कंपनीसोबत व्यवहार झाल्याचं उघड

Latest Marathi News Live Update : रांजणी ते तुळजापूर पायी पालखी, 400 वर्षांची परंपरा आजही दिमाखात!

Sangli News : कडाक्याची थंडीही रोखू शकली नाही शिराळकरांना; दुपारपर्यंत तब्बल ६६.७३% मतदानाची नोंद

T20I World Cup 2026 साठी भारताच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण; ब्रँड अँबेसिडर रोहित शर्माचीही उपस्थिती; पाहा Video

Horoscope Prediction : येत्या चार दिवसांमध्ये पालटणार 3 राशींचं नशीब ! शनी देवांच्या कृपेने घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT