Prime Minister Narendra Modi working from the newly designated Seva Teerth office following the official PMO address change announcement.

 

esakal

देश

Seva Teerth inaugurates : पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलला! जाणून घ्या, 'सेवा तीर्थ' मधून मोदींनी कोणते निर्णय सर्वात आधी घेतले?

PMO inaugurated at 'Seva Teerth : नवी दिल्लीला भारताची आधुनिक राजधानी म्हणून औपचारिकरित्या स्थापित झाल्यापासून ९५ वर्षे पूर्ण होत आहेत.

Mayur Ratnaparkhe

PMO address change and Modi first decisions from Seva Teerth office पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(शुक्रवार) पंतप्रधाना कार्यालयाची नवीन इमारत  सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. तसेच आज दिवस ऐतिहासिक देखील आहे, कारण नवी दिल्लीला भारताची आधुनिक राजधानी म्हणून औपचारिकरित्या स्थापित झाल्यापासून ९५ वर्षे पूर्ण होत आहेत.

सेवा तीर्थ संकुलात पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आहे. सेवा तीर्थ संकुलाच्या भिंतीवर 'नागरिक देवो भव' हे ब्रीदवाक्य देखील कोरलेले आहे. सेवा तीर्थ येथे स्थलांतरित झाल्यानंतरच्या पहिल्या निर्णयांमध्ये, पंतप्रधान मोदींनी सेवेची भावना प्रतिबिंबित करणारे महत्त्वाचे निर्णय घेतले. हे निर्णय समाजाचा प्रत्येक घटक शेतकरी, महिला, तरुण आणि गरीब जनता आदींना प्रभावित करतात.

यानुसार अनेक महत्त्वाचे नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पंतप्रधान मदत योजना, लखपती दीदींचे लक्ष्य दुप्पट करून ६ कोटी करणे, कृषी पायाभूत सुविधा निधी २ लाख कोटी करणे आणि दह हजार कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.० यांचा समावेश आहे.

पूर्वी, १९३१ पासून नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक ही सत्तेची केंद्रे होती. नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉकमधील या प्रतिष्ठित इमारतींना 'युग युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय' मध्ये रूपांतरित करण्याची सरकारची योजना आहे, जे भारताच्या संस्कृतीच्या प्रवासाचे प्रदर्शन करणारे एक जागतिक दर्जाचे संग्रहालय असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT