Murder sakal
देश

दिल्लीत धक्कादायक घटना : गळा चिरुन महिलेची हत्या; चौघांना ठोकल्या बेड्या

नरेश शेंडे

नवी दिल्ली : इशान्य दिल्लीत (Northeast delhi) चार चोरट्यांनी एका ५२ वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या (Woman Murder) केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेकडे असलेले किंमती ऐवज लंपास करण्यासाठी चोरट्यांनी (valuables robbery) त्या महिलेवर विटेने हल्ला केला. ही घटना मंगळवारी ११ जानेवारीला करावल नगर येथे घडली. तारा बोध असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी बुधवारी अटक (four culprit arrested) केली. अमन, आकाश, मनिष आणि वैभव जैन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी उत्तर प्रदेशच्या लोणी येथील रहिवाशी आहेत. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. ( Police arrested four culprits in woman murder and robbery crime in northeast delhi)

याबाबत सविस्तर वृत्त असं की, "आरोपी अमनला त्याच्या व्यवसायात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अमनला झटपट पैसे कमवायचे होते. त्यामुळे अमनने त्याच्या सहकाऱ्यांसह मृत महिलेच्या कुटुंबियांना लुटण्याचा योजना आखली होती." अशी माहिती अमनने पोलिसांनी केलेल्या तपासात दिली आहे. दरम्यान, अमनचे मृत महिलेच्या कुटुंबियांशी व्यवासायीक कामानिमित्त संबंध होते. आरोपींनी ताराला तिच्या घराच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या इमारतीजवळ बोलावले. त्यानंतर त्यांनी ताराची गळा चिरुन हत्या करुन तिच्याजवळ असलेला ऐवज चोरी केला.

पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून या घटनेची खबर मिळाली. त्यानंतर पोलीसांनी आरोपी अमन आणि मनिषला जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ पकडलं. तसंच या हत्येमागे हात असणाऱ्या इतर दोन आरोंपींच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी आरोपींविरोधात करावल पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Book Festival: पुस्तक महोत्सवात ५० कोटींची उलाढाल; ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री, साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट

Pune Accident: 'अक्कलकोटचे मायलेक रेल्वेच्या धडकेत ठार'; पिंपरी-चिंचवडमधील घटना, अंत्यविधीसाठी गावी गेले अन्..

Maharashtra Cold Wave : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भात थंडीचा कडाका वाढणार, किमान तापमान ८.६ अंशांवर; हवामान विभागाचा अंदाज समोर

‘परफेक्ट लूक’चा अट्टहास; देशात सौंदर्योपचारांची झपाट्याने वाढ, वर्षभरात १२.८८ लाख प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्याला आजपासून होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT