Gold Smuggling
Gold Smuggling Esakal
देश

नको तिथं लपवलं सोनं; पोलिसांनी पकडलं आणि...

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या गोष्टीची तस्करी करण्यासाठी लोक काय शक्कल लढवतील याचा नेम नाही. त्यांच्या तस्करीचे मार्ग पाहून सामान्य माणसंच नाही तर पोलिसही अचंबित होतात. सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करण्यासाठी तरुणाने अशीच शक्कल लढवली. त्याने चक्क आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येच (Rectum) सोनं लपवलं. दुबईतून (Dubai) परतलेला हा तरूण सोने तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. त्यामुळे त्यांनी या तरूणाला जयपूर एअरपोर्टवर ताब्यात घेतलं. (Police have arrested a person who smuggled gold in private parts.)

तरुणाची विचारपूस केली असता त्याने पोलिसांना काहीच सांगितले नाही. मग पोलिसांनी त्याला तासभर एका जागेवर बसवून ठेवले. शेवटी त्रास सहन न झाल्यामुळे तरूणानं स्वतःहून कबुली दिली. तरुणाकडून जप्त केलेलं सोनं हे पेस्ट फॉर्ममध्ये होतं. ज्याचं वजन अर्धाकिलोपेक्षा जास्त होते आणि त्याची किंमत 25 लाख रुपये होती.

अटक केलेला तरुण मुळचा दिल्लीचा असून तो दुबईमध्ये टॅक्सी चालवायचा. सोने तस्करांनी त्याला 20 हजार रुपये आणि विमान तिकीटाचं आमिष दाखवलं होतं. या आमिषाला तो बळी पडला. हे सोने त्याला दुबईतून जयपूरला पोहोचवायचे होते. त्यानुसार पेस्ट फॉर्ममधील सोन्याच्या दोन कॅप्सूल त्याला देण्यात आल्या. या कॅप्सूल त्याने आपल्या गुदद्वारामध्ये लपवल्या.

पोलिसांना या गोष्टीची आधीपासून माहिती होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला एअरपोर्टवर बसवून ठेवलं, असे असिस्टेंट कमिशनर भारत भूषण अटल यांनी सांगितले. सुरुवातीला तो काहीच बोलला नाही. परंतु साधारणपणे तासाभरानंतर तरूणाला प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवलेल्या कॅप्सूलमुळे त्रास होऊ लागला. हा त्रास असह्य झाल्यामुळे त्याने स्वतःच आपल्याकडे सोनं असल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील सोनं जप्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT