Political strategist Prashant Kishor addresses the media explaining why he chose not to contest the Bihar Assembly Elections.

 

sakal

देश

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

Prashant Kishor’s Big Reveal on Bihar Assembly Elections : मला निवडणूक लढवायची होती, पण... असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor reveals reason behind not contesting Bihar Assembly Elections: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. अनेक पक्ष विविध जागांवर दावे करत आहेत. यंदा बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीनेही उडी घेतली आहे. तर प्रशांत किशोर हे निवडणूक लढवणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय़ का घेतला, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर यावर खुद्द प्रशांत किशोर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणाले, "निवडणुका न लढण्याचे कारण वेळेची कमतरता आहे. दशकांमध्ये पहिल्यांदाच, एक पक्ष शून्यापासून सुरुवात करत आहे आणि २४३ जागांवर निवडणूक लढवत आहे. यामध्ये शेकडो लोक लागले आहेत. मी निवडणूक लढवावी की नाही याबद्दल पक्षात व्यापक चर्चा झाली.’’

तसेच, ‘’एकूणच, प्रचारासाठी आमच्याकडे १८ दिवस शिल्लक आहेत. जर मी निवडणूक लढवली असती तर आम्हाला किमान ३ ते ४ दिवस तिथे घालवावे लागले असते. त्या चार दिवसांत, मी इतर ३० ते ४० विधानसभा मतदारसंघांना भेट देऊ शकलो नसतो. म्हणून, पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांनी ठरवले की शक्य तितक्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचणे ही पहिली प्राथमिकता आहे आणि म्हणून, मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.’’ असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, प्रशांत किशोर म्हणाले, "आम्ही २४३ जागांवर निवडणूक लढवत आहोत. इतर कोणत्याही पक्षाकडे सर्व जागा लढवण्याची ताकद नाही. बिहारमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा त्रिकोणी बनली आहे असे विरोधी पक्षांचेही मत आहे. आम्ही प्रत्येक पैसा गोळा करून पक्षाची उभारणी केली. मी एक जागा जिंकून आमदार होण्यापेक्षा प्रत्येक जनसुराज उमेदवाराने जिंकणे चांगले."

याचबरोबर ‘’जर जनसुराज उमेदवारांना असे वाटत असेल की प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या विजयाची शक्यता वाढेल, तर मी स्वतःसाठी चार दिवस प्रचार करण्याऐवजी, ३०-४० उमेदवारांसाठी प्रचार करणे चांगले. मला निवडणूक लढवायची होती, परंतु पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांनी सांगितले की ही माझी जबाबदारी आहे. अखेर लढण्याच्या फायद्यांवर आणि तोट्यांवर चर्चा केल्यानंतर, निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल, 'असे' असेल स्वरुप

MLA Monica Rajale: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २०८ कोटी मंजूर: आमदार मोनिका राजळे; दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात वर्ग होणार

Karnataka Politics : ठरलं...! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे नेमकं काय म्हणाले...

प्रेमाची गोष्ट 2 मध्ये स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम घालणार धुमाकूळ ! रिलीजपूर्वीच जोडीची चर्चा

India Afghanistan relations: अफगाणिस्तानातील भू-राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भारताची भूमिका

SCROLL FOR NEXT