Rajasthan Police esakal
देश

धक्कादायक! आरोपीच्या गर्भवती पत्नीला पोलिसांनी पोटात घातली लाथ; गर्भातच बाळाचा मृत्यू, तोंडातून येत होतं रक्त

मारहाण झाल्यामुळं गर्भवती कमलेशला पोटात दुखू लागलं. ती वेदनेनं कोसळली.

सकाळ डिजिटल टीम

ही महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. मारहाणीमुळं तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झालाय.

Crime News : नूह जिल्ह्यातून (Nuh District) एक धक्कादायक घटना समोर आलीये. दोन मुस्लिमांना जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या श्रीकांतच्या गर्भवती पत्नीला राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) बेदम मारहाण केलीये.

ही महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. मारहाणीमुळं तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झालाय. राजस्थान पोलिसांनी आरोपी श्रीकांतच्या नूह जिल्ह्यातील घरावर छापा टाकला होता.

श्रीकांतच्या कुटुंबीयांच्या आरोपावर राजस्थान पोलिसांकडून कोणतंही मत व्यक्त करण्यात आलेलं नाही. हरियाणा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. श्रीकांतची आई दुलारी यांनी शनिवारी नूह जिल्ह्यातील नगीना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.

दुलारींनी सांगितलं की, 16 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजता राजस्थान पोलिसांचे 30-40 लोक आमच्या घरी आले. कुटुंबीयांना धमकावून त्यांनी जबरदस्तीनं घराचं दार उघडलं. घरात शिरत श्रीकांतची चौकशी करू लागले. श्रीकांत घरी नसल्याचं आम्ही पोलिसांना सांगितलं. हे ऐकून पोलिस चांगलेच संतापले.

त्यांनी घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. कुटुंबातील लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, श्रीकांतची गर्भवती पत्नी कमलेश एका खोलीत होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी तिलाही सोडलं नाही. त्यांनी कमलेशला कॉटवरून ढकलून मारहाण केली.

मारहाण झाल्यामुळं गर्भवती कमलेशला पोटात दुखू लागलं. ती वेदनेनं कोसळली. तिची प्रकृती ढासळत असल्याचं पाहून त्यांनी तात्काळ जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, मंडीखेडा इथं नेलं. मात्र, सुनेची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहून तिला नल्हार वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आलं. गरोदर कमलेशची प्रकृती खालावतच राहिली. कमलेश आणि न जन्मलेल्या बाळाला असलेला धोका पाहून डॉक्टरांनी 18 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया केली. ऑपरेशननंतर बाळाचा जन्म मृत झाला होता. नवजात बालकाच्या तोंडातून रक्त येत होतं आणि नाडी बंद झाली होती. तर, माझी सून अजूनही गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल आहे, असं दुलारींनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT