Narendra-Modi 
देश

पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT