priyanka gandhi ANI
देश

UP : मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दलच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींचा घुमजाव

आपणच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले होते.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आगामी काळातील विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Elections 2022) काँग्रेसने (Congress) जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या निवडणुकीत त्याच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर काल एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत: याबद्दल बोलताना आपणच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं सांगितलं होतं.

युवा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी प्रियंका गांधींना (Priyanka Gandhi) राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मुख्यमंत्री पदाचा कुणी चेहरा दिसतो आहे का? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका गांधी म्हणाल्या की, माझा चेहरा दिसत नाही का? असं म्हणत सुचक इशारा दिला होता. त्यामुळे प्रियंका गांधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याच्या चर्चा काल दिवसभर सुरू होत्या. मात्र आता पुन्हा प्रियंका गांधींनी आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यावरून संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतंय.

काँग्रेसने राज्यात उमेदवारांची निवड करताना महिलांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या पक्षाच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी 'लडकी हूं, लड सक्ति हूं' मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमे अंतर्गत विधानसभा निवडणुकीत 40 टक्के तिकिटं महिलांना दिली जातील, अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी आणखी 41 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये 16 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पहिल्या यादीप्रमाणेच महिलांचा वाटा ४० टक्के आहे. यापूर्वी 13 जानेवारी रोजी पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये सुद्धा 50 महिलांना तिकीटं देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT