Propose Day 2023
Propose Day 2023 esakal
देश

Propose Day 2024 : प्रेम करावं तर नेताजी आणि एमिलीसारखं; दुरावा असूनही शेवटपर्यंत निभावलं जाणारं!

सकाळ डिजिटल टीम

‘तूम मुझे खून दो, मै तूम्हे आझादी दुंगा’, असे शब्द कानावर पडले की एकच नाव आपल्याला आठवतं. ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच. नेताजींचं संपूर्ण जीवन एक रहस्यच गाथाच आहे. त्यांच्या जीवनात कोणतीही गोष्ट सहज घडलेली नाही. मग, त्यांच्या आयुष्यातील एकमेव प्रेम तरी त्यांना कसे सहज मिळेल.

नेताजी यांचे लग्न झाले होते का?, ते कोणाच्या प्रेमात होते का? अशा प्रश्नांची उत्तरे आजही अनेकांना माहिती नाहीत. आज व्हॅलेंटाईन विकमधील दुसरा दिवस आहे. प्रपोज डे. यानिमित्तानेच आज नेताजी आणि त्यांची अनोखी प्रेमकथा जाणून घेऊ.

1934 ची गोष्ट. ब्रिटीश सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतातून हद्दपार केले होते. तेव्हा ते आजारीही होते. त्यामूळे त्यांनी आपला मुक्काम युरोपमधील व्हिएन्ना येथे हलवला होता. येथे राहून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यांशी निगडित सहकाऱ्यांना पत्रे लिहिणे सुरू ठेवले.

तिथेच त्यांना स्वत:चे आत्मचरीत्र लिहीण्याचा विचार आला. त्यासाठी त्यांना एका टायपिस्टची गरज होती. मग त्यांच्या एका मित्राने त्याची मिस एमिली शँकलेशी त्यांची ओळख करून दिली. नेताजींनी एमिलीला कामावर ठेवले.

त्यावेळी नेताजी आणि एमिली एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यात प्रेम फुलत गेले. दोघेही एकत्र युरोपात अनेक ठिकाणी फिरायला जायचे. एकमेकांसोबत वेळ घालवायचे. दोन वर्षांनंतर 1936 मध्ये नेताजी सुभाषचंद्र भारतात परतले.

त्यांच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रक असूनही ते एमिलीला पत्र लिहिण्यासाठी वेळ काढायचे. नेताजींनी लिहिलेली ही पत्रे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी प्रकाशित झाली तेव्हा लोकांना त्यांच्यातील रोमँटिक बाजू पहायला मिळाली. नेताजी जीव ओतूनच ती पत्रे लिहीत असावेत असे दिसते.

“तू माझ्या प्रेमात पडलेली पहिली स्त्री आहेस. माझ्या आयुष्यातही तू शेवटची स्त्री राहावी अशी माझी इच्छा आहे, असे रोमॅंटीक भाष्यही नेताजींनीच केलेले आहे, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. एमिली आणि नेताजी यांनी लग्न केलं. त्या लग्नात ना हार फुले होते ना भडजी तरीही नेताजी आणि एमिली एकमेकांचे झाले. त्यांना अनिता नावाची मुलगी झाली.

मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी म्हणजे 8 जानेवारी 1943 रोजी सुभाषचंद्र जपानला निघाले. एमिली आणि मुलगी अनिता यांच्यासोबतची ही शेवटची भेट ठरली कारण 1945मध्ये विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

या अनोख्या लग्नाबद्दल फक्त नेहरूंना माहीत होतं. पण, नंतरच्या काळात ते बोस यांच्या कुटुंबालाही माहिती झाले. म्हणूनच नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर एमिलीसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम पाठवायला सुरुवात केली. जेणेकरून तिचा आणि मुलगी अनिताचा उजरनिर्वाह पार पडू शकेल.

जेव्हा बोस यांच्या कुटुंबियांनी एमिली यांची भेट घेतली. तेव्हा तिला भारतात येण्यास सांगितले. मात्र, एमिलीच्या आईची प्रकृती ठिक नसल्याने त्या येऊ शकल्या नाहीत. पण, 1९६० मध्ये नेताजींची मुलगी अनिता भारतात येऊन गेल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT