Sania Mirzapur esakal
देश

Sania Mirza: सानिया मिर्झा बनणार देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

सानिया मिर्झा एनडीएमधून उत्तीर्ण होऊन देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Success Story: सानिया मिर्झाचं सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. सानिया मिर्झाने एनडीए परीक्षेत १४९ वा क्रमांक पटकावला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या १९ जागांपैकी फ्लाइंग विंगमध्ये तिला दुसरे स्थान मिळाले आहे. सानिया मिर्झा आता लवकरच फायटर पायलट बनणार आहे. सानिया मिर्झा नॅशनल डिफेंस अॅकेडमी (एनडीए) मधून उत्तीर्ण होऊन देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे.

सानिया मिर्झा ही मिर्झापूरच्या देहात कोतवाली क्षेत्रातील जसोवरमध्ये राहाणाऱ्या एका टीव्ही मेकॅनिकची मुलगी आहे. तिच्या वडिलांचे नाव शाहिद अली असे आहे. सानियाने तिचे १० वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंडित चिंतामणि दुबे इंटर कॉलेजमधून पूर्ण केले आहे. ती इयत्ता १२ वी मध्ये देखील जिल्ह्यात टॉप केलं.

सानियाने १० एप्रिल २०२२ रोजी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या यादीतही तिचे नाव आहे. ती २७ डिसेंबर रोजी खडकवासला, पुणे येथील एनडीए अॅकॅडमीमध्ये सामील होणार आहे.

सानियाने लहानपणापासूनच हवाई दलात भरती होण्याचे आणि फायटर पायलट बनण्याचे स्वप्न पाहिले होते. बारावीच्या शिक्षणानंतर तिने यासाठी कोचिंगही केले. तिची मेहनत अखेर फळाला आली आहे. तिच्या या कामगिरीचा तिच्या आई-वडिलांशिवाय संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT