Puneet Superstar Net Worth esakal
देश

Puneet Superstar Net Worth: पुनीत सुपरस्टार Instagram मधून झाला लखपती; जाणून घ्या संपत्ती

सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी २ मधून बाहेर पडलेला लॉर्ड पुनीत सध्या चर्चेत आहेत.

धनश्री भावसार-बगाडे

Bigg Boss OTT 2 Fem : पुनीत सुपरस्टार सध्या फार चर्चेत आहे. नुकताच तो सलमान खानच्या बिग बॉस ओटीटी २ मधून बाहेर काढण्यात आला आहे. पण बिग बॉसमधून बाहेर आल्यावर त्याच्याविषयी आधीपेक्षा जास्त चर्चा होत आहेत. प्रत्येकालाच त्याच्या विषयी जाणून घेण्यात उत्सुकता वाढली आहे. त्याच्या नेटवर्थ विषयी जाणून घेऊया.

कोण आहे पुनीत सुपरस्टार?

त्याचं खरं नाव प्रकाश कुमार आहे. पण लोक त्याला पुनीत सुपरस्टार आणि लॉर्ड पुनीत या नावाने ओळखतात. पुनीत व्यवसायाने कॉमेडियन आहेत आणि त्यांचे फनी रिल्स फार पॉप्युलर आहेत. तो इंस्टाग्राम आणि एमएक्स टकाटक सारख्या व्यासपीठावरपण अॅक्टीव्ह असतात. पण सगळ्यात पहिल्यांदा टिकटॉकवर प्रसिद्ध झाला होता.

सोशल मीडियावर तो मेमे बॉय म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तो जास्त प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच बिग बॉसमध्ये प्रवेश मिळाला होता. विशेष म्हणजे अशाच गोष्टींमुळे त्याला शो बाहेरही पडावे लागले.

लॉर्ड पुनीचं नेटवर्थ किती?

सोशल मीडियावर लॉर्ड पुनीतचे सर्व व्हिडीओ व्हायरल होतात. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर त्याचे फॉलोविंग्ज सुद्धा जबरदस्त वाढलेत. इंस्टावर त्यांचे २.९ मिलीयन फॉलोवर्स आहेत. हेच कारण आहे की ब्रँड्सपण त्यांना प्रमोशनसाठी अप्रोच करतात.

उपलब्ध माहितीनुसार तो इंस्टाग्रामवरून वर्षाला १० ते १५ लाख रुपये कमवतो. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंट सहित त्यांचे युट्यूब उत्पन्न साधारण २२ ते २५ लाख रुपये आहे. याव्यतिरीक्त इतर स्रोतांतून ५ ते ७ लाखाजवळ कमवतो.

पुनीतने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लिहिलं आहे की, जर कोणाला बर्थडे विश करायचं असेल किंवा प्रमोशनल इव्हेंट्स करायचे असतील तर त्याच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधावा. अशा कामांमधूनही त्याला उत्पन्न मिळतं. पुनीत सुपरस्टारचं एकूण उत्पन्न साधारण ५७ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

पुनीतचे वैशिष्ट्य हे आहे की, तो आपल्या व्हिडीओज मधून जेवढं कमवतो त्यातला ६० टक्के भाग गरिबांच्या मदतीसाठी देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT