Flypast on Republic Day Sakal
देश

प्रजासत्ताक दिन: भारत जगाला दाखवणार आस्मानी ताकद; राफेलसह 75 विमानं सज्ज

Flypast on Republic Day : भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलात अलीकडेच सामील झालेल्या राफेल विमानासह भारतीय संरक्षण दलांची तब्बल 75 विमाने राजपथावरून उड्डाण करणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

26 जानेवारी 2022 रोजी भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलात अलीकडेच सामील झालेल्या राफेल (Rafale) विमानासह भारतीय संरक्षण दलांची तब्बल 75 विमाने राजपथावरून उड्डाण करणार आहेत. एकंदरीतच यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा भव्यदिव्य करण्याची योजना सरकारने आखली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) परेडदरम्यान हवाईदल (IAF), भूदल (Army) आणि नौदलाच्या (Navy) 75 विमानांसह राजपथवर आतापर्यंतचा सर्वात भव्य फ्लायपास्ट होईल. 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi ka Amrut Mahotsav), अंतर्गत हे भव्य उड्डाण होणार असल्याचं IAF PRO विंग कमांडर इंद्रनील नंदी म्हणाले.

फ्लायपास्ट (flypast) हा प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) परेडचा एक महत्त्वाचा भाग आहे. राफेल (Rafale), भारतीय नौदलाची मिग 29 (MiG 29K) आणि P-8I (surveillance aircraf) विमाने, जग्वार लढाऊ विमाने परेडमध्ये आपले सामर्थ्य दाखवतील. विनाश फॉर्मेशनमध्ये पाच राफेल राजपथावरून उड्डाण करतील. नौदलाची MiG 29K आणि P-8I देखरेख करणारी विमाने, 17 जग्वार लढाऊ विमानांसह एकूण 75 विमानं एअरशो मध्ये सहभागी होतील.

दरवर्षी 26 जानेवारी रोजी, भारत नवी दिल्लीतील भव्य राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आपले लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगती दाखवतो. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती समाविष्‍ट करण्‍यासाठी प्रजासत्ताक दिनाचा समारंभ आता दरवर्षी 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT