Rahul Gandhi esakal
देश

सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य संपवले, राहुल गांधींची टीका

एकीकडे बेरोजगारी, दुसरीकडे महागाई...

सकाळ डिजिटल टीम

उदयपूर : सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य संपवले आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केली आहे. उदयपूर येथील पक्षाच्या नव संकल्प चिंतन शिबीरात आज रविवारी (ता.१५) ते बोलत होते. पुढे राहुल गांधी म्हणाले, एकीकडे बेरोजगारी, दुसरीकडे महागाई, युक्रेनमध्ये युद्ध झाले आहे. आगामी काळात चलनवाढीवरही त्याचा परिणाम होईल. (Rahul Gandhi Attack On Modi Government Over Youth Politics)

काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे, की ऑक्टोबर महिन्यात पूर्ण काँग्रेस पक्ष (Congress Party) हा जनतेमध्ये जाऊन दौरा करणार आहे, या शब्दात त्यांनी भविष्यातील पक्षाचे धोरण सांगितले. जनतेबरोबर जे नाते काँग्रेसशी होते, ते पुन्हा नव्याने स्थापित केले जाईल. हे शाॅर्टकटने होणार नाही. त्यासाठी घाम गाळूनच काम करावे लागेल, असा सल्ला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

आपल्याला विचार न करता जनतेत जाऊन बसावे लागेल. त्यातून त्यांच्या समस्या कळतील व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपले जनतेबरोबर जे कनेक्शन होते ते पुन्हा बनवावे लागेल. जनता जाणून आहे, की काँग्रेस पक्षच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT