Dudhsagar Waterfall Railway Police Tourists esakal
देश

Dudhsagar falls Video : दूधसागर धबधबा पाहायला जाताय? मग ही बातमी आधी वाचा, अन्यथा उठाबशा काढाव्या लागतील! व्हिडिओ व्हायरल

भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानातील (Bhagwan Mahavir National Park) जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर (Dudhsagar Waterfalls) जाण्यास सध्या बंदी आहे.

सकाळ डिजिटल टीम

अर्धा जुलै महिना संपला तरी अद्याप वन खात्याने दूधसागर धबधब्यावरील प्रवेश बंदी हटवलेली नाही.

फोंडा : भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानातील (Bhagwan Mahavir National Park) जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर (Dudhsagar Waterfalls) जाण्यास सध्या बंदी आहे. असे असतानाही हजारोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी रेल्वेमार्गे येत आहेत. रविवारी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत पर्यटकांना उठाबशा काढण्यास भाग पाडले.

पर्यटकांना मिळालेल्या या शिक्षेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. दुसरीकडे बंदी असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत कसे पोहचतात, असा प्रश्न उपस्थित होत असून वन खाते मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

कारवार, गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर पश्चिम घाटातील हिरव्यागार डोंगरातून फेसाळत खाली येणारा जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते; मात्र सध्या येथे येण्यास गोवा सरकारने (Goa Government) बंदी घातली आहे.

बंदीची कल्पना नसल्याने या धबधब्याचे मनमोहक रूप डोळ्यांत साठवण्यासाठी परराज्यांतून हजारो पर्यटक नाराज होऊन परतत आहेत. बंगळूर येथून येणारी यशवंतपूर एक्स्प्रेस ही रेल्वे पहाटे साडेतीन वाजता आणि दिल्लीहून येणारी निझामुद्दीन एक्स्प्रेस पहाटे चार वाजता दूधसागर येथे येते.

या दोन्ही गाड्यांतून परराज्यांतून हजारो पर्यटक दररोज उतरतात; मात्र दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याने नजर चुकवून गेलेल्या पर्यटकांना रेल्वे पोलिसांनी पकडले व त्यांना उठाबशा काढायला लावल्या. पुन्हा या ठिकाणी नजर चुकवून आल्यास मोठा दंड भरावा लागेल, अशी ताकीदही रेल्वे पोलिसांनी दिली.

विनातिकीट प्रवास

दूधसागर येथे जाण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. मडगावाहून रेल्वे आली रे आली की, या पर्यटकांची एकच झुंबड उडते. रेल्वेच्या मिळेल त्या दारातून दूधसागरकडे जाणारे पर्यटक रेल्वेत प्रवेश करतात आणि प्रवाशांच्या सीटवर बसतात.

त्यामुळे इतर प्रवाशांची कुचंबणा होते. हे पर्यटक तिकीट न काढता कुळे येथे रेल्वेत चढत असल्याने इतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे आमची धडक कारवाई चालूच राहणार, असे रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

धबधबा खुला करण्याची मागणी

अर्धा जुलै महिना संपला तरी अद्याप वन खात्याने दूधसागर धबधब्यावरील प्रवेश बंदी हटवलेली नाही. त्यामुळे या पर्यटनावर अवलंबून असलेले कुळे येथील शंभरहून अधिक टुरिस्ट गाईड बेरोजगार आहेत. दूधसागर धबधबा प्रवेश बंदीचा फटका कुळे येथील हॉटेल व संबंधित व्यवसायांनाही बसला आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटनासाठी कधी खुला करणार, असा प्रश्न स्थानिक लोकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT