Rain Latest Updates esakal
देश

मुसळधार पावसापासून महाराष्ट्र, गुजरातला दिलासा; 'या' 5 राज्यांत पुढील 3 दिवसांत मोठा पाऊस

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय.

नवी दिल्ली : महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातला (Gujarat) पावसानं (Heavy Rain) झोडपून काढल्यानंतर आता उत्तर भारतावर पावसाचे ढग दाटून आलेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये येत्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं (Indian Meteorological Department, IMD) वर्तवलीय. उत्तर प्रदेशातही या काळात काही ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.

IMD नं हिमाचलमध्ये 16 जुलै, राजस्थानमध्ये (Rajasthan) 17 जुलै, पंजाब आणि हरियाणामध्ये 19 जुलै, उत्तराखंडमध्ये 16 आणि 17 जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. 18 जुलै रोजी पूर्व उत्तर प्रदेशातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये 16, हिमाचल आणि यूपीमध्ये 19, उत्तराखंडमध्ये 18 आणि 19 तारखेला काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असंही म्हटलंय.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असून कालपासून पावसाचा जोर ओसरलाय. छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश, ओडिशा, गोवा, केरळ आणि किनारी कर्नाटकात पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं आयएमडीनं म्हटलंय. त्याचप्रमाणं 16 जुलै रोजी तामिळनाडू, पाॅंडेचेरी आणि कराईकलमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, ईशान्य अरबी समुद्र आणि गुजरातच्या लगतच्या किनारी भागात चक्रीवादळ प्रणाली कायम आहे. त्याच्या प्रभावाखाली गुजरात किनारपट्टीच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT