Rajasthan Assembly Election 2023 esakal
देश

Rajasthan Election Voting : राजस्थानच्या 199 विधानसभा जागांसाठी आज मतदान; 1,863 उमेदवार रिंगणात, भाजप-काँग्रेसमध्ये 'काटे की टक्कर'

राजस्थानमध्ये आज (शनिवार) म्हणजेच, 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या निधनामुळं करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे.

Rajasthan Assembly Elections Voting : राजस्थानमध्ये आज (शनिवार) म्हणजेच, 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान होत आहे. काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या निधनामुळं करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे.

विधानसभेच्या 199 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार रिंगणात असून त्यांचं भवितव्य 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदार ठरवणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje), सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत (ईव्हीएम) बंद होणार आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, यावेळी पुन्हा काँग्रेस सरकारची पुनरावृत्ती होईल, हे निश्चित आहे. सरकारची पुनरावृत्ती करण्याचा सध्या जनतेचा मूड आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील बारमेर जिल्ह्यातील पार गावात एका कुटुंबासाठी स्वतंत्र मतदान केंद्र बनवण्यात आलं आहे. हे राज्यातील सर्वात लहान मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर एका कुटुंबातील 35 सदस्य मतदान करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT