Rajasthan Assembly Election Results 2023 esakal
देश

Rajasthan Congress : 'पेपर लीक, लाल डायरी,भ्रष्टाचाराचे आरोप.. ' पाच वर्षांपूर्वी मजबूत असलेली काँग्रेस अशी कमकुवत होत गेली

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे.

बाळकृष्ण मधाळे

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि त्यांच्या हमी योजनांचा राजस्थानातील जनतेवर कोणताही परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही.

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. सध्याच्या ट्रेंडमध्ये अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या पराभवामुळं सत्तेतून बाहेर पडल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि त्यांच्या हमी योजनांचा राजस्थानातील जनतेवर कोणताही परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही.

काँग्रेस सरकारच्या (Congress) काळात राज्यात गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. यासोबतच गेहलोत सरकारच्या धोरणांबाबत राज्यातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. यामुळंच अशोक गेहलोत यांची जादू चालली नाही आणि काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.

1. काँग्रेसची कमकुवत संघटना

काँग्रेसच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे, त्यांची कमजोर संघटना. पूर्वीच्या काळी काँग्रेस सेवा दल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस या संघटना पक्षासाठी चांगलं काम करत असत. या सगळ्यातून त्यांचा लोकांशी थेट संपर्क होत होता. सरकारी धोरणं आणि योजनाही लोकांपर्यंत पोहोचल्या. मात्र, गेल्या काही वर्षांत काँग्रेसची संघटना खूपच कमकुवत झाली आहे.

2. राज्यात गुन्हेगारी वाढली

राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून राजस्थान संपूर्ण देशात गुन्हेगारीत अव्वल स्थानावर आहे. राज्यात मुली आणि महिला त्यांच्या घरात आणि ऑफिसमध्येही सुरक्षित नाहीत. काँग्रेसच्या पराभवाचं हेही प्रमुख कारण मानलं जात आहे.

3. विरोधी सत्ता

राज्यात काँग्रेस पक्षाविरोधात जनतेत विरोधाची लाट उसळली होती. उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर अशोक गेहलोत यांनी कुटुंबाला फक्त 5 लाख रुपये दिले होते. तर, जयपूरमध्ये इक्बाल नावाच्या तरुणाला रस्त्याच्या कामावरुन बेदम मारहाण करण्यात आली. त्यावेळी राजस्थान सरकारनं त्यांच्या कुटुंबासाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. या प्रकरणाबाबतही लोकांमध्ये तीव्र नाराजी होती.

4. गटबाजी

राजस्थान काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी होती. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटातील भांडणानं देशभरात चर्चेचा विषय बनवला होता. पाच वर्षे काँग्रेसचं सर्वोच्च नेतृत्व हा घोळ मिटवण्यात व्यस्त होतं. मात्र, तोडगा निघत नव्हता.

5. योजनांचा लाभच मिळाला नाही

अशोक गेहलोत यांच्या सरकारनं शेतकरी, महिला, मजूर इत्यादींसाठी अनेक योजना राबवल्या. पण, याचा फारसा फायदा जनतेला झाला नाही. कारण, काँग्रेसच्या या योजना फक्त कागदावरच तयार होत्या. त्याची नीट अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. हे देखील काँग्रेसच्या पराभवाचं कारण मानलं जात आहे.

6. निवडणूक प्रचाराचा अभाव

काँग्रेसच्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे, निवडणूक प्रचाराचा अभाव. भाजपच्या तुलनेत अशोक गेहलोत यांनी निवडणूक प्रचारासाठी कोणतीही रणनीती आखली नाही. केंद्र सरकारनं राज्यातील 200 विधानसभा जागांवर जोरदार प्रचार केला. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी रोड शो आणि सभा घेतल्या. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला.

7. India Signing

India Signing हे देखील काँग्रेसच्या पराभवाचं कारण ठरलं आहे. अशोक गेहलोतही अटल बिहारी वाजपेयींप्रमाणं India Signing चे बळी ठरले. गेहलोत यांनी वाजपेयींच्या अनेक योजनांच्या धर्तीवर अनेक रस्ते बांधले. सगळीकडंच चकाकी दिसत होती. मात्र, या सर्व गोष्टी जनतेनं स्वीकारल्या नाहीत. कारण, त्याचा लाभ जनतेला मिळाला नाही.

8. वादग्रस्त विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधानं केली. अनेक वेळा सभेत भाषेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचवेळी भाजपला आपल्या बाजूनं जनतेला वळवण्यात यश आलं.

9. काँग्रेसची हमी नाकारली

अशोक गेहलोत सरकारनं गेल्या पाच वर्षात जनतेच्या हितासाठी कोणतीही विशेष योजना आणलेली नाही. निवडणुका जवळ येताच काँग्रेसनं हमीभाव योजना सुरू केली. वेळेअभावी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि त्याचा लाभ जनतेला मिळाला नाही. अशा स्थितीत जनतेनं काँग्रेसचा हमीभाव नाकारला.

10. पेपर लीक, लाल डायरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप

निवडणुकीच्यादरम्यान, काँग्रेसनं महागाई निवारण शिबिरं आयोजित करून आपल्या बाजूनं वातावरण निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अशोक गेहलोत यांनी निवडणुकीपूर्वी चिरंजीवी योजनेची मर्यादा 50 लाख रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, पेपरफुटी, लाल डायरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सरकारला घेरलं होतं. तरुणांनी गेहलोत यांच्या हमींवर विश्वास ठेवला नाही, त्यामुळं हे देखील पराभवाचं कारण असू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT