पंतप्रधान मोदी पराभवाच्या भितीमुळे असे खोटे छापे टाकून अटक करत आहेत.
सध्या पाच राज्यांच्या निवडणूकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर टोलेबाजी सुरु आहे. (Assembly Elecction 2022) दरम्यान, या पाच राज्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणुक चुरशीची होईल असं बोललं जातं आहे. दरम्यान, पंजाबमधील (Punjab Election 2022) विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग हनी यांना ईडीने (ED) अटक केल्याने राजकारणाने नवा मोड घेतला आहे. भूपिंदरसिंग हनीला अवैध वाळू उत्खनन प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आज दुपारी ईडीने त्यांना जालंधर न्यायालयात हजर केले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Sujrevala) यांनी सलग चार ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
या ट्वीटमध्ये रणदीप सुरजेवाला म्हणतात, पंजाब निवडणुकीच्या १५ दिवस आधी मोदी सरकारचे राजकीय नाटक पुन्हा सुरू झाले आहे. भाजपचा निवडणूक विभाग (ईडी) रिंगणात उतरला आहे. सुरजेवाला यांनी एकामागून एक ट्विट करत भाजपवर आरोप केले आहेत. पंजाबमधील जनता शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने उभे राहण्याची किंमत चुकवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी पराभवाच्या भितीमुळे असे खोटे छापे टाकून अटक करत आहेत. पंजाब निवडणुकीच्या १५ दिवस आधी पुन्हा राजकीय खेळी सुरू झाल्या आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे.
भाजपाचा कॉंग्रेसवर निशाणा म्हणाले..
या अटकेवरून भाजपने काँग्रेसवरही (Cogress) निशाणा साधला आहे. याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते अनिल सरीन म्हणाले, कायदा आणि ईडी त्यांचे काम करतात. छापे टाकले तेव्हा 10 कोटी रोख आणि 56 कोटी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या आरोपांवर अनिल सरीन म्हणाले की, बेकायदा वाळू उत्खननात मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचे आम्ही यापूर्वीही म्हणत होतो. छाप्यांमध्ये काहीही सापडले नसताना राजकीय सूडबुद्धीने बोलले असते. याचे उत्तर त्यांनी पंजाबच्या जनतेला द्यावे.
दरम्यान, विधानसभा निवडणुका जशा जवळ येतील तसे पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजप आणि कॉंग्रेस नेत्यांत कमालीची चुरस असून आगामी काळातही राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.