Sanjay-Raut on Tipu Sultan Controversy eSakal
देश

'खऱ्या हिंदुत्त्ववाद्याने जिन्नांना गोळी मारली असती, गांधीजींना नाही'

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एका हिंदुत्त्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती.

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादाचा (HIndutwawadi) मुद्दा पुढे आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एका हिंदुत्त्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती.सर्व हिंदुत्त्ववाद्यांना वाटतं की गांधीजी राहिले नाहीत. जिथं सत्य आहे तिथं आजही बापू जिवंत आहेत.' दरम्यान, हिंदुत्त्ववाद्याचा मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊत यांनी म्हटलं की,'खरा हिंदुत्त्ववादी असता तर त्याने गांधीजींना नाही तर जिन्नांना गोळी मारली असती, ते देशभक्तीचं काम झालं असतं'

राहुल गांधींनी केलेल्या ट्विट संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, खरा हिंदुत्त्ववादी असता तर त्याने जिन्नांना गोळी मारली असती. गांधीजींना का गोळी मारली असती? पाकिस्तानची मागणी ही जिन्नांची मागणी होती. तुम्ही मर्द होतात. तुमच्याकडे मर्दानगी होती, तर पाकिस्तानची मागणी केल्यानंतर, ज्यांनी इथं हिंसाचार पसरवला, फाळणी केली त्यांना गोळी मारली असती. ते देशभक्तीचं काम असतं.

महात्मा गांधींची आज पुण्यतिथी आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. संजय राऊत म्हणाले की,'गांधीजींना गोळी मारणं, एका निशस्त्र, फकीराला गोळी मारणं योग्य नव्हतं. यामुळे जगाला दु:ख झालं आणि आजही आपण शोक व्यक्त करतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT