Diesel-petrol prices will go up again Diesel-petrol prices will go up again
देश

यंदा पेट्रोल नव्हे तर डिझेलचे दर वाढणार; सरकारी सूत्रांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपासून डिझेल व पेट्रोलच्या (petrol) दरात वाढ झालेली नाही. यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, हा दिलासा फार काळ टिकणार नाही. विक्रमी महागाईनंतर लवकरच डिझेल-पेट्रोलचे दर पुन्हा वाढणार आहेत. यावेळी पेट्रोलपेक्षा डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. ४० दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. (Diesel-petrol prices will go up again)

सरकारी सूत्रांनी ‘आज तक’च्या संलग्न चॅनल बिझनेस टुडे टीव्हीला याबाबत माहिती दिली. यावेळी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती एका झटक्यात वाढणार नाही. त्या पूर्वीप्रमाणेच हळूहळू वाढवण्यात येणार आहे. यावेळी फरक एवढाच असेल की डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त वाढणार आहे. याचे कारण तेल विकणाऱ्या सरकारी कंपन्यांचे पेट्रोलपेक्षा (petrol) डिझेलवर जास्त नुकसान होत आहे. डिझेलच्या दरात ३ ते ४ रुपयांनी वाढ होऊ शकते तर पेट्रोल २ ते ३ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

तेल विकणाऱ्या सरकारी कंपन्यांना डिझेलच्या बाबतीत प्रतिलीटर २५ ते ३० रुपये आणि पेट्रोलच्या बाबतीत ९ ते १० रुपयांचा तोटा होत असला तरी त्यांचे दर काही प्रमाणात वाढणार आहेत, हे निश्चित. दर किती वाढणार याचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सूत्राने सांगितले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर काही दिवसांनी दोन्ही इंधनांच्या किमती सातत्याने वाढू लागल्या. २२ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत डिझेल (Diesel) आणि पेट्रोलच्या दरात १४ वेळा वाढ करण्यात आली. त्यानंतर ४० दिवसांपासून त्यांच्या दरात वाढ झालेली नाही. आता पुन्हा वाढ होणार असल्याचे समजते.

भारत कच्च्या तेलाचा दुसरा सर्वांत मोठा आयातदार देश

भारत ८० टक्के कच्चे तेल इतर देशांकडून खरेदी करतो. यातील बहुतांश कच्चे तेल पश्चिम आशियाई देश आणि अमेरिकेतून येते. भारत रशियाकडून फक्त दोन टक्के कच्चे तेल खरेदी करतो. भारत हा कच्च्या तेलाचा दुसरा सर्वांत मोठा आयातदार देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

Vasudev Tradition: 'परंड्यातील सुरेश सुरवसेंकडून वासुदेव संस्कृतीचे जतन'; पदवीपर्यंत शिक्षण घेऊन जपली पिढ्यांपासूनची परंपरा..

SCROLL FOR NEXT