Republic Day 2023 :
Republic Day 2023 : esakal
देश

Republic Day 2023 : इंग्रजांनी छळ केला, स्तन कापले पण सुभाषबाबूंबद्दल तोंडातून अवाक्षरही बाहेर पडले नाही!

सकाळ डिजिटल टीम

अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले. त्यातील काही मोजकीच नावे आपल्याला ठाऊक आहेत. पण, खऱ्य़ा अर्थाने स्वातंत्र्यासाठी जीवनाचा त्याग केलेली अनेक स्वातंत्र्यसेनानी दुर्लक्षित आहेत.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांमध्ये देशप्रेम जागे करणे महत्त्वाचे होते. ते काम महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग या साऱ्यांनी अगदी लिलया पेलले. त्यापैकी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील एक शिपाई ज्यांनी देशासाठी केलेला त्यागाची तुलना होऊ शकत नाही. त्या स्वातंत्र्यसेनानींचे नाव आहे नीरा आर्या. (Republic Day 2023 : Neera arya an unsung warrior of india)

नीरा आर्या हे असेच एक नाव आहे. या क्रांतिकारक कन्येने भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले. नेताजी सुभाषचंद बोस यांना वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या पतीची हत्याही केली होती. ज्यावेळी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा त्यांचे स्तनही कापले गेले. तरीही त्या देशसेवाच करत राहिल्या. त्यांनी इंग्रजांपूढे तोंड उघडले नाही.

नीरा यांचा जन्म 5 मार्च 1902 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकरा येथे झाला. त्या प्रतिष्ठित व्यापारी सेठ छजुमल यांची कन्या होत्या. नीरा आर्य यांचा जन्म झाला तेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. लहानपणापासूनच नीराने देशासाठी इंग्रजांविरूद्ध आवाज उठवायला सुरुवात केली होती.

निरा यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळींमध्ये भाग घेतला आणि देशाप्रती आपले समर्पण दाखवले. लहान वयातच नीरा यांचे लग्न 'श्रीकांत जयरंजन दास' यांच्याशी केले. लग्न झाल्यावरही त्यांच्या देशप्रेमात बदल झाला नाही.

सहसा लग्न झाल्यानंतर लोकांची विचारसरणी बदलते. पण नीरा यांनी स्वातंत्र्याचा मार्ग सोडला नाही. नीराला आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य हवे होते. पण, त्यांचे पती ब्रिटिश सरकारसाठी काम करत होते. क्रांतिकारी कारवायांमध्ये नीरा 'आझाद हिंद फौज'च्या संपर्कात आल्या. त्या 'झाशी रेजिमेंट'चा एक भाग बनल्या.

नीराचे पती जयरंजन दास यांना ब्रिटिशांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी करण्याची आणि त्यांची हत्या करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जयरंजन यांनी यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना यश मिळाले नाही. जेव्हा नीरा यांना पतीच्या या मिशनबद्दल समजले. तेव्हा नीरा यांनी त्या गोष्टीला विरोध केला.

एका दिवशी जयरंजन त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नीरा यांना तो निर्णय घ्यावा लागला. नीरा यांनी देशसेवा करणाऱ्या बोस यांना वाचवण्यासाठी देशद्रोही पतीला भोसकून ठार मारले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाचवले. त्यासाठी नीरा यांना इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तुरुंगवासात नीरा यांना अनेक यातनांचा सामना करावा लागला. नीरा यांना अंदमानच्या कोठडीत पाठवण्यात आले. तिथे एका छोट्या कोठडीत डांबण्यात आले. कोठडीत नीरा यांना लोखंडी साखळदंडात बांधले होते. त्यांच्यासोबत सतत गैरवर्तन केले जात होते. त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून क्रूर इंग्रज सरकारने त्यांचे स्तनही कापले होते. इंग्रज नीरा यांना नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहेत हे विचारत राहिले. पण, त्यांनी कसलीच माहिती इंग्रजांना दिली नाही.

इतिहासकारांच्या मते. नीरा यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती दिली असती तर त्यांना जामीन मिळाला असता. पण त्यांनी तोंड उघडले नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, नीरा तुरुंगातून बाहेर आल्या त्यांनी उर्वरित आयुष्य हैदराबादमध्ये फुले विकण्यात घालवले. 1998 मध्ये त्यांचे निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT