Sudhir Kumar, biggest fan of Sachin Tendulkar टिम ई सकाळ
देश

सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता सुधीर कुमारला बिहार पोलीसांकडून मारहाण

मारहाणीनंतर सुधीर कुमारची पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार

सकाळ डिजिटल टीम

मुझफ्फरपुर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) जगभरात अनेक चाहते आहेत. मात्र सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता म्हणून सुधीर कुमारला ओळखल जाते. याच सुधीरला बिहार पोलीसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारच्या मुझफ्फरपुर जिल्ह्यातील टाऊन पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने सुधीर कुमारला (Sudhir Kumar) शिवीगाळ आणि मारहाण केली. गुरवारला सुधीरचा चुलत भाऊ किशन कुमारला टाऊन पोलीस स्टेशन येथील पोलीसांनी ताब्यात घेतले होते. जेव्हा सुधीरला हा संपुर्ण प्रकार कळला, तेव्हा त्याने पोलीस स्टेशन गाठले. मात्र प्रकरण काय आहे, याविषयी त्याला कल्पना नव्हती. पोलीसांनी सुधीरचा चुलत भाऊ किशन कुमारला लॉकअपमध्ये बंद केले होते. हे पाहून सुधीर कुमार सरळ किशनकडे गेला आणि त्याच्याशी बोलू लागला. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हे निदर्शनास येताच त्याने सुधीरला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. सुधीरने यावर विरोध करताच पोलीस कर्मचाऱ्याने सुधीरला मारहाण करत पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले. विशेष म्हणजे याच टाऊन पोलीस स्टेशनचे सुधीर कुमारच्या हस्ते उद्घाटन झाले होते.

या प्रकरणावरून सुधीर कुमारने पोलीस उपअधीक्षक रामनरेश पासवान यांच्याकडे तक्रार केली. यावर पोलीस उपअधीक्षक यांनी सुधीरला या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा चालवत असल्याच्या टिमक्या...; आनंद परांजपे यांची शिवसेनेवर जहरी टीका, काय म्हणाले?

Maharashtra Latest News Live Update : मांजरी खुर्दमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

"माझा घटस्फोट झालेला नाही" मराठी अभिनेत्रीने चर्चांवर मौन सोडत केली ट्रोलर्सची बोलती बंद; म्हणाली..

Rajnath Singh statement : 'जर पाकिस्तान अजूनही डंपर आहे, तर ते त्यांचे...' ; राजनाथ सिंह यांनी लगावला टोला!

SCROLL FOR NEXT