SBI 
देश

स्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी खुशखबर; 'ही' कर्जे होणार स्वस्त!

वृत्तसंस्था

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित (एमसीएलआर) कर्ज दरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

आता एसबीआयच्या एमसीएलआरशीसंबंधित गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत. नुकत्याच रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर 'एसबीआय'ने मात्र व्याजदरात कपात केली आहे.  

'एसबीआय'ने सर्वच मुदतीच्या कर्जाचा दर 0.10 टक्क्याने कमी केला आहे. एक वर्षासाठीचा दर आता 8 टक्क्यांवरून 7.90 टक्के झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील एमसीएलआरमधील ही सलग आठवी कपात आहे. मात्र रेपो दरांशी संलग्न कर्जे आणि ठेवीदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे 'एसबीआय'ने स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बँकांनी ग्राहकांना द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सलग पाच पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केला होता. मात्र बँकांकडून हव्या तेवढ्या प्रमाणात कर्जदरात कपात करण्यात आली नाही. एसबीआय देशातील स्वस्तात कर्ज पुरवठा करणारी बँक असून एमसीएलआरच्या कपातीमागे ग्राहकांना फायदा पोचवण्याचा उद्देश असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

गेल्या आठवडयात आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो दर 5.15 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्के कायम ठेवला आहे.

फायदा कोणाला मिळणार? 

बँकेच्या 'एमसीएलआर'शी संबंधित असलेल्या सर्वांनाच दर कपातीचा फायदा मिळणार नाही. ते 'रीसेट डेट'वर अवलंबून असेल. एमसीएलआरआधारीत कर्जांमध्ये रीसेट पीरियड एक वर्षांचा असतो. ज्या ग्राहकांची रीसेटची तारीख 10 डिसेंबर किंवा त्यानंतर आहे त्यांना व्याजदर कपातीचा फायदा मिळेल. 10 डिसेंबर किंवा त्यानंतर ग्राहकांनी एमसीएलआर आधारीत कर्जाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना घटवलेल्या व्याजदराचा फायदा मिळेल.

एमसीएलआर म्हणजे काय?

बँकेमध्ये ग्राहकांकडून कर्जावर किती व्याज आकारायचे हे ठरविण्यासाठी एक प्रणाली वापरली जाते, त्यालाच एमसीएलआर म्हणतात. व्याजदर निश्चित करण्यासाठी आरबीआयने एक एप्रिल 2016  पासून एमसीएलआरची अंमलबजावणी सुरु केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंदिरा गांधींकडून सुनेला थेट मारुती कंपनी भेट? सोनिया गांधींबाबत BJP खासदाराचा मोठा दावा; चौकशी अहवालातून धक्कादायक खुलासे समोर

Eknath Shinde Pandharpur Visit : 'विठुराया दुष्काळाचं संकट दूर होऊदे'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठल-रुक्मिणीला साकडे

Narhari Zirwal Private Secretary : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या तत्कालीन खासगी सचिवांचे थेट निलंबन, कर्मचाऱ्यांवर टाकला होता दबाव; सर्वात मोठ्या कारवाईने खळबळ

Latest Marathi News Live Update : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह उद्यापासून भारत दौऱ्यावर

Pune Weather: महाबळेश्वरपेक्षाही , पुण्याचे तापमान थंड, किमान तापमान ११.३ अंशांवर

SCROLL FOR NEXT