india covid 
देश

कोरोनाची दुसरी लाट भारतात येणार की नाही? काय सांगतात तज्ज्ञ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटींच्या वर पोहोचली आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशात दुसरी लाट येण्याची भीतीही अनेक वेळा व्यक्त केली गेली होती. मात्र आता आरोग्य तज्ज्ञांनी दुसरी लाट येण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. जर कोरोनाची दुसरी लाट आलीच तर ती आधीच्या इतकी नसेल असंही म्हटलं आहे. व्हायरॉलॉजीस्ट डॉक्टर शाहिद जमील यांनी सांगितलं की भारतात रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. 

जमील यांनी म्हटलं की, सध्या दररोज 25 हजारांच्या आसपास नवे रुग्ण सापडत आहेत. तर सप्टेंबरमध्ये हेच प्रमाण 93 हजारांपर्यंत पोहोचलं होतं. नोव्हेंबरच्या शेवटी काही काळ रुग्णांमध्ये वाढ झाली होती. मात्र मला नाही वाटत की दुसरी लाट येईल. कारण सणांचा काळ आणि एका राज्याच्या निवडणुकीनंतरही रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली नाही. याचं कारण काय आहे? दुसऱ्या राष्ट्रीय सीरो सर्व्हेनुसार नोंद असलेल्या रुग्णांच्या 16 पट संभाव्य बाधितांचा आकडा असू शकतो. यानुसार देशात 16 कोटी लोकांना कोरोनाची लागण झालेली असू शकते.

देशात आतापर्यंत 30 ते 40 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली असणंही शक्य आहे. असुरक्षित आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना लागण होत राहील. इम्युनिटी एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ राहते. त्यामुळे आपल्यासमोर पुढच्या काही वर्षांपर्यंत ठराविक काळात कमी जास्त वाढ दिसू शकते. चांगली लस यावर प्रभावी ठरू शकते असंही जमील यांनी सांगितलं. 

कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेबद्दल विचारले असता क्लिनिकल साइन्टिस्ट डॉक्टर गगनदीप कांग यांनी सांगितलं की, कोरोनाचं संक्रमण पहिल्याइतकं वेगवान नसेल आणि संक्रमण झालेल्यांचं प्रमाण आधीएवढं नसेल. 

कांग यांनी म्हटलं की, मला नाही वाटत की आपल्याकडं हर्ड इम्युनिटी आहे आणि त्यामुळे पुन्हा काळजी करण्याची गरज नाही असं वाटून गाफिल राहणं धोक्याचं आहे. आपण हे ठरवायला हवं की आपल्याकडे कोरोनाचा प्रसापर कसा रोखता येईल. आधी ज्या चुका झाल्या त्या कशा टाळता येतील याकडे लक्ष द्यायला हवं. 

कोरोनाचं संकट टळलेलं नाही आणि हर्ड इम्युनिटीने ते दूर होणार नाही. पाश्चिमात्य देशांना जसा दुसऱ्या लाटेचा फटका बसला तसं आपल्याकडं होईल असं वाटत नसल्याचंही कांग यांनी सांगितलं. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर केके अग्रवाल यांनी म्हटलं की, भारतात सध्या 30 ते 40 टक्के लोकसंख्या आहे जी कोरोनाबाधित झालेली नाही. भारत, अर्जेंटीना, पोलंड हे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या पण दुसरी लाट न आलेल्या देशांपैकी आहेत. 

अग्रवाल म्हणाले की, सर्व शक्यता पाहता भारतात दुसरी लाट येणार नाही. आलीच तर ती आधीइतकी मोठी नसेल. त्यातच भारतात डिसेंबर अखेर लसीकरण सुरू झालं तर पुढच्या तीन महिन्यात कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. 

आयसीएमआरचे साथ रोग विज्ञान प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितलं की, काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तर काही राज्यांत चढ उतार दिसत आहे. यात बहुतांश राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं दिसतं. मात्र काही राज्यात अजूनही सावध राहण्याची गरज आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT