Sharad Pawar eSakal
देश

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Congress: "आमचा पक्ष गांधी आणि नेहरुंच्या विचारसरणीवर चालणार पक्ष आहे. त्यामुळे आमची आणि काँग्रेसची विचारसरणी एकच आहे."

आशुतोष मसगौंडे

माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असणाऱ्या शरद पवार यांनी देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच येत्या काळात देशातील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलिन होतील असे शरद पवार द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

याच मुद्द्यावर पुढे शरद पवार यांना त्यांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षही काँग्रेसमध्ये विलिन होणार का? असे विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, "आमचा पक्ष गांधी आणि नेहरुंच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आमची आणि काँग्रेसची विचारसरणी एकच आहे."

याचबरोबर पवार म्हणाले की, "काँग्रेमध्ये त्यांचा पक्ष विलिन करायचा की नाही, हे सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. आमची विचारसरणी काँग्रेसच्या जवळची आहे यात शंका नाही. पण कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास आम्ही तो एकत्रितपणे घेऊ. आणि असा निर्णय झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पचवायला खूप अवघड जाईल."

या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेबाबतही भाष्य केले. यावर पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या समवीचारी पक्षांबरोबर काम करण्यास उद्धव ठाकरेही सकारात्मक आहेत. त्यांचे विचारही आमच्यासारखेच आहेत.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्या त्यांना जाणवले की, महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप विरोधात अंडरकरंट आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशासह देशातील इतर भागांतही भाजपविरोधात वातावरण असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी बारामतीमध्ये विद्यामान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांचे बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. याबाबत पवार यांना विचारले असते ते म्हणाले, "आम्ही बारमती जिंकतो."

यावेळी पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राजकियदृष्या त्यांना पुन्हा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार म्हणाले, "आमचे पवार कुटुंब दरवर्षी दिवाळीला बारामतीमध्ये एकत्र येते. पण त्यांना राजकीयदृष्ट्या परत यायचे असेल तर आम्ही 'त्यांना' स्वीकारणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT