Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case : केस अन् चेहरा लेजर टॉर्चने जाळला तर, हाडे ठेचून...; आफताबची आरोपपत्रात कबुली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपी आफताब पूनावाला याने तीन महिन्यांनंतर श्रद्धा वालकरचे शीर पुरले होते, असे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. (Shraddha Murder Case)

यासोबतच आरोपींनी श्रद्धाची हाडे मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून फेकून दिली होती. दिल्ली पोलिसांनी २४ जानेवारी रोजी ६६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये हत्येशी संबंधित सर्व बाबींचा समावेश होता.

या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, श्रद्धा आणि आफताबच्या भांडणाचे मुख्य कारण आफताबची अनेक मुलींशी मैत्री होती. त्याची दिल्ली ते दुबईपर्यंतच्या मुलींशी मैत्री होती.

आरोपपत्रानुसार, आफताबने मार्बल कटिंग मिक्सर ग्राइंडरने श्रद्धाची अनेक हाडे बारीक केली आणि नंतर पावडर बनवून फेकून दिली. तसेच केस जाळण्यासाठी आणि चेहरा खराब करण्यासाठी चिंगारी टॉर्चचा वापर केला. तसेच हत्येनंतर ३ महिन्यांनी त्याने डोक्याचा काही भाग फेकून दिला होता होता.

आफताबने अंगावर शहारे आणणारी माहिती दिली आहे. आरोपपत्रात असे लिहिले आहे की आफताबने श्रद्धाच्या शरीराच्या एका मांडीचा भाग छत्तरपूर पहाडीच्या जंगलात फेकला. पुढील ४ ते ५ दिवसांत त्याने मृतदेहाचे १७ तुकडे केले. तसेच त्याने प्रत्येक हाताचे आणि पायाचे तीन-तीन तुकडे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Bans Social Media : नेपाळमध्ये मोठा डिजिटल स्ट्राईक ! युट्यूब,फेसबूकसह २३ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी, सरकारने सांगितले 'हे' कारण

Kolhapur Friend Killed : ६० वर्षांची मैत्री एका शिवीमुळे संपली, जिवलग मित्रानेच धारधार शस्‍त्राने केला खून; दोघेही ७३ वयाचे, असा आहे घटनाक्रम...

Latest Maharashtra News Updates : नंदुरबारमध्ये पुढील २४ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Latur Crime: पतीनेच पत्नीचा खुन करुन मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला; साथीदारांच्या मदतीने उशी दाबून घेतला जीव

Who Is IPS Anjali Krishna : अजित पवारांना नडणाऱ्या आयपीएस अंजली कृष्णा कोण? मुरुम उत्खननाविरोधातील कारवाईमुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT