lemon sakal
देश

5 रुपयांचं लिंबू जीवावर बेतलं, दुकानदारानं घरात घुसून गोळ्या झाडल्या

पाच रुपयांचं लिंबू एका जणाच्या चांगलेच जीवावर बेतले.

सकाळ डिजिटल टीम

पाच रुपयांचं लिंबू एका जणाच्या चांगलेच जीवावर बेतले. एका दुकानदार आणि ग्राहकातील लिंबू खरेदीनंतर वाद इतका वाढला की दुकानदाराने चक्क ग्राहकावर त्याच्या घरी जाऊन गोळ्या झाडल्या. राजस्थानच्या भरतपूरमध्ये ही थरारक घटना आहे. या घटनेने परिसरासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Shopkeepe fired on customer just due to 5 rupees lemon dispute shocking news goes)

दिनेश जाटव चा मुलगा रामजीत हा महेंद्र बच्चू यांच्या दुकानात लिंबू घेण्यासाठी गेला होता. 5 रुपये किमतीचे लिंबू विकत घेतले. त्याने दुकानदाराला 100ची नोट दिली पण सुट्टया पैशाच्या कारणावरून दिनेश आणि महेंद्र यांच्यात वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की दुकानदाराचे त्याच्या साथीदारास दिनेशच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दिनेशच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

एका पाच रुपयाच्या लिंबूवरुन एवढी मोठी घटना घडल्याने चर्चेला उधान आले. सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण बरेच गाजत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT