Shraddha Murder Case and asaduddin owaisi  
देश

Shraddha Murder Case : श्रद्धा केसवर अखेर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले, लव्ह जिहाद...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणाबाबत आता राजकारण तापलं आहे. यावर आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया आली आहे. ओेवेसी यांनी गुरुवारी श्रद्धा मर्डर केसवरून सुरू असलेल्या राजकारणावरून भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीका केली. (Shraddha Murder Case news in Marathi)

या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेलं राजकारण पूर्णपणे चुकीचं आहे, असं ओवेसी म्हणाले. "श्रद्धा हत्या प्रकरण लव्ह जिहादचे प्रकरण नाही. ही महिला अत्याचाराची घटना आहे. त्यामुळे त्याकडे त्याच दृष्टीने पाहायला हवं. या घटनेचा आम्ही निषेध केला आहे. ओेवेसी पुढं म्हणाले की, देशातील पुरुषांना महिलांवर अत्याचार करण्याचा आजार झाला आहे. पुरुषांच्या या आजारावर उपचार व्हायला हवेत.

दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेला धार्मिक रंग दिल्याचा टोलाही ओवेसी यांनी लगावला. याआधी 20 नोव्हेंबर रोजी आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी भारताला समान नागरी कायदा आणि 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. तसेच भारताला आफताब (श्रद्धा हत्येतील आरोपी) सारख्या व्यक्तीची गरज नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेत्याची गरज असल्याचं बिस्वा यांनी म्हटलं होतं.

यावेळी ओवेसी यांनी आझमगडच्या घटनेचा उल्लेख करत म्हटलं की, आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून बाहेर फेकला. अशा घटना दुःखद आहेत, त्यांचे राजकारण केले जाऊ नये आणि त्याकडे हिंदू-मुस्लिम दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये, असं आवाहनही ओवेसी यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Latest Maharashtra News Updates : गोंदियाच्या उच्चेपूर गावात सुरू होणाऱ्या बिअर बारला ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT