Sirohi Brothers Love Story  esakal
देश

आयुष्यभराची साथ सुटली! एकाच दिवशी लग्न अन् एकाच वेळी दोन भावांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जन्मापासूनच या दोन भावांमध्ये आयुष्यभर इतकं प्रेम होतं की, त्याचा दाखला परिसरात दिला जातो.

Sirohi Brothers Love Story : राजस्थानच्या (Rajasthan) सिरोहीमध्ये (Sirohi) दोन भाऊ मरेपर्यंत एकत्र राहत होते. या दोन भावांची अनोखी प्रेमकहाणी परिसरात चर्चेचा विषय बनलीय. भावांमधील प्रेम, आपुलकी आणि मरेपर्यंत एकत्र राहण्याची भावना, याबद्दल लोक या भावंडांची उदाहरण देताहेत. चला तर मग जाणून घेऊया, या दोन भावांची कहाणी..

खरं तर, आम्ही सिरोहीच्या रेवदर उपविभागातील डांगराली गावातील रावताराम आणि हिराराम देवासी (Rawatram and Hiraram Brother) या दोन वृद्ध भावांबद्दल सांगत आहोत. जन्मत: दोन्ही भावांमध्ये अनेक वर्षांचं अंतर असतानाही या भावांची साथ आयुष्यभर टिकली. योगायोग असा की, दोघांचंही लग्न एकाच दिवशी झालं आणि दोघांनीही एकाच दिवशी आयुष्याचा निरोप घेतला.

शेवटच्या श्वासापर्यंत भावाची साथ

अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या कालावधीत रावताराम आणि हिराराम यांनी अखेरचा श्वास घेतला. जन्मापासूनच या दोन्ही भावांमध्ये आयुष्यभर इतकं प्रेम होतं की, त्याचा दाखला परिसरात दिला जातो. डांगराली गावातील रावताराम व हिराराम यांच्या घरात सध्या शोकाकुल वातावरण आहे. रावताराम यांचा मोठा मुलगा भिकाजी यांच्यावर आता कुटुंबाची जबाबदारी आहे. वडील रावताराम आणि काका हिराराम यांच्या परस्पर प्रेमाच्या इच्छेला सांभाळण्याची जबाबदारी भिकाजींच्या मनात घर करुन आहे. दोन्ही कुटुंबात एकूण 11 भावंडे आहेत.

भिकाराम यांनी सांगितलं की, वडील आणि काका यांचं प्रेम व बंधुभावाची कहाणी या परिसरात प्रसिद्ध आहे. दोघंही एकत्र कुटुंब सोडून जातील, यावर त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये. काका हिराराम काही दिवसांपासून आजारी होते; पण वडील रावताराम अगदी तंदुरुस्त होते. 28 जानेवारी रोजी सकाळपासून वडिलांनी काहीही खाल्लं नव्हतं. जेव्हा आईला हे समजलं, तेव्हा तिनं वडिलांना काहीतरी खाण्याची विनंती केली. आईच्या सांगण्यावरून वडिलांनी बिस्किटं खाल्ली आणि मग काकांची अवस्था विचारून ते झोपी गेले, त्यानंतर ते उठलेच नाहीत. 29 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. तर, दुसरीकडं काका हिराराम यांना थंडी वाजून आल्यानं त्यांनीही 15 मिनिटांत आपला जीव सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT